IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

IAS vs IPS Salary: देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे यूपीएससी. यूपीएससी परीक्षा देऊन देशसेवा करतात. IAS आणि IPS पदावर काम करतात.
IAS vs IPS Salary
IAS vs IPS SalarySaam Tv
Published On

आयुष्यात प्रत्येकाची काहीना काही स्वप्ने असतात. कोणाला डॅाक्टर , इंजिनिअर तर IAS, IPS अधिकारी बनायचं असतं. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी काही जणं UPSCची परीक्षा देत असतात. सर्वानांच सरकारी नोकरी करायची इच्छा असते. देशातील लाखो नागरिक UPSCची परीक्षा देण्याचं ट्राय करतात. भारतीय प्रशासकीय सेवेची UPSC परीक्षा खूप कठिण असते. या परीक्षेत लाखो उमेदवार अभ्यास करुन परीक्षेला बसतात. पण त्यातील काहीच उमेदवार परीक्षा पास होवून नोकरीसाठी पात्र ठरतात.

UPSC परीक्षा पास केल्यानंतर उमेदवारांना चांगला पगार , आणि सुख ,सुविधा मिळत असतात. या उमेदवारांना वर्षातून दुसऱ्या देशात प्रवास करायला मिळतो. आज आपण UPSC परीक्षा उत्तीर्ण केल्यावर कोणत्या पदवीसाठी किती पगार आहे आणि त्या पदवीसाठी कोणती कामे करावे लागतात. आज या गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत.

भारतातील IAS आणि IPS या उच्च पदवीच्या सरकारी नोकऱ्या आहेत. हे दोन्ही पद भारताच्या सुरेक्षेसाठी कामे करत असतात. या पदानां मोठ्या प्रमाणात सन्मान असून त्यांच्या पगारामध्ये थोडासा बदल आहे.

IAS vs IPS Salary
PPF Scheme: 'ही' सरकारी योजना बनवेल तुम्हाला करोडपती, 12,500 रुपये गुंतवल्यानंतर मिळणार एवढी मोठी रक्कम; वाचा...

IAS आणि IPS ची कामे

आयएएस अधिकारी विविध सरकारी विभागांचे प्रमुख असतात. त्याचबरोबर ते राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरांची अंमलबजावणीचे काम करतात. आयएएस अधिकारी नागरीकांपर्यत सरकारी सेवा पोहचवण्याचे ही कामे करत असतात. या अधिकाऱ्यानां कायदा आणि गुन्हेगारी रोखण्याची ही कामे असतात.

आयपीएस अधिकारी पोलीस सेवा दलात काम करत असतात. या अधिकाऱ्यानां जिल्ह्यात कायदा आणि सुव्यव्यस्था रोखण्याची कामे असतात. व्हीआयपी, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या सुरेक्षेसाठी आयपीएस अधिकाऱ्यांची गरज असते. त्याचबरोबर वाहतुकीसाठी सुरक्षा प्रदान करणे, गुन्ह्यांचा शोध घेणे, अपघाताची कामे साभांळणे इत्यादी कामे आयपीएस अधिकारी करत असतात.

IAS vs IPS Salary
Schemes: भारताप्रमाणे या देशांमध्येही चालते आयुष्मान भारत योजना; फरक काय? जाणून घ्या सविस्तर

IASआणि IPS अधिकाऱ्यांचे पगार

IAS आणि IPS ही दोन्ही पदे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्यांच्या या कामांमध्ये अंतर असले तरी ही दोन्ही पदे देशाच्या सुरेक्षेसाठी नेहमी साहाय्य असतात. पण या देन्ही पदांमध्ये आयएएस अधिकाऱ्याला जास्त अधिकार असतो. कारण आयएएस अधिकऱ्याकडे प्रशासकीय सेवेच्या कामांची जबाबदारी असते. याबरोबर आयपीएस अधिकारी पोलीस दलात काम करण्यास नेहमी त्तपर असतात. नागरीकांच्या सुरेक्षेसाठी कोणत्याही कारणांवरुन वाद पाहायला मिळत असतात. त्याच्यासाठी आयपीएस अधिकारी निवडले जातात.

या दोन्ही पदांच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर, IAS अधिकारी जास्तीत जास्त पगार कमवू शकतात. पण या अधिकाऱ्यानां ५६,१०० रुपये पगार मिळतो. त्याचबरोबर IPS अधिकाऱ्याला २,५०,००० महिना पगार मिळू शकतो. पण या पदासाठी त्यांना २,२५,०००० रुपयांपर्यत पगार मिळतो.

IAS vs IPS Salary
NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com