Jammu-Kashmir Election: पहिल्या टप्प्यातील 24 जागांवर मतदान सुरु , स्थलांतरित काश्मिरी बजावणार मतदानाचा अधिकार

Jammu Kashmir Election: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी मतदान होत आहे. साधरण ३५,५०० परदेशी काश्मिरी मतदार जम्मू, उधमपूर आणि दिल्ली येथे स्थापन केलेल्या २४ विशेष मतदान केंद्रांवर मतदान करण्यास पात्र आहेत.
Jammu-Kashmir Election: पहिल्या टप्प्यातील 24 जागांवर मतदान, स्थलांतरित काश्मिरी करणार बजावणार मतदानाचा अधिकार
Jammu Kashmir Election Saam Digital
Published On

जम्मू आणि काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरात राहणारे 35,000 हून अधिक विस्थापित काश्मिरी पंडित 24 मतदान केंद्रांवर मतदान करण्यास पात्र आहेत. जम्मू-काश्मीरमधील सात जिल्ह्यांतील विधानसभेच्या 24 जागांसाठी बुधवारी निवडणूक होणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील सात जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांसाठी बुधवारी निवडणूक होणार आहे. जागांवर एकूण 219 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विस्थापित काश्मिरी पंडितांना दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यांतील 16 विधानसभा मतदारसंघात मतदान करता येणार आहे.

“उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 35,500 स्थलांतरित काश्मिरी मतदार जम्मू, उधमपूर आणि दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेल्या 24 विशेष मतदान केंद्रांवर मतदान करण्यास पात्र असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन आयुक्त डॉ. अरविंद कारवानी यांनी दिलीय. निवडणूक प्रक्रिया डॉ. कारवानी यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. जम्मूमधील 34,852 स्थलांतरित काश्मिरी मतदारांनी या भागातील 19 विशेष मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नोंदणी केली आहे.

विस्थापित काश्मिरी पंडितांना दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यांतील 16 विधानसभा मतदारसंघात मतदान करता येणार आहे. काश्मीर खोऱ्यातून विस्थापित झालेले बहुतांश काश्मिरी पंडित दिल्लीत राहतात, परंतु केवळ 600 च्या आसपास लोकांनी निवडणुकीत मतदान करण्यासाठी नोंदणी केलीय. “ मतदान मुक्त आणि निष्पक्ष व्हावे यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती डॉ. करवानी यांनी माहिती दिलीय.

सर्व मतदान केंद्रावरील सुरक्षा वाढवण्यात आलीय. वुद्ध, महिला आणि दिव्यांगासाठी मतदान केंद्रावर सर्व आवश्यक गोष्टी पुरवण्यात येणार आहेत. प्रवाशी काश्मिरी मतदारांसाठी उभारण्यात आलेल्या २४ मतदान केंद्रावर या सुविधा देण्यात येतील. यात जम्मूच्या 19 उधमपूरमधील एका आणि दिल्लीमधील चार मतदान केंद्राचा समावेश आहे.

दरम्यान या निवडणुकीत रोझी रैना (रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया) आणि अरुण रैना (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) अनुक्रमे राजपोरा आणि पुलवामा मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे 23.27 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात 5.66 लाख तरुणांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com