NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

Government Schemes: केंद्र सरकारने लहान मुलांसाठी पेन्शनची योजना सुरु केलीये. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी 'NPS वात्सल्य' नावाची पेन्शन योजना सुरु केली आहे.
तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना
Nps Vatsalya SchemeSaam Tv
Published On

केंद्र सरकार लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करतंय.. अशातच आता केंद्र सरकारनं नवीन योजना सुरु केलीये. मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारनं 'NPS वात्सल्य' योजना सुरु केलीये. या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी तरतूद म्हणून निवृत्तिवेतन खातेही उघडता येणार आहे. या योजनेमुळं पालकांना आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षीत करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे.

पालक ऑनलाइन माध्यमातून तसेच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून NPS वात्सल्य योजनेत खातं उघडू शकतात. खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपये भरावे लागतात. त्यानंतर सदस्यांना वार्षिक किमान 1000 रुपये खात्यात जमा करावे लागणार आहेत. मुलाला वयाची 18 वर्ष पूर्ण होताच या खात्याचे रुपांतर नियमीत पेन्शन योजनेत होणार आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबवण्यात येतेय.

तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना
EPF Calculation : टॅक्स, व्याजदर, TDS, कंपनी आणि तुमचे किती पैसे...; PF बाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं वाचा एका क्लिकवर

योजनेच्या अटी काय?

  • खाते फक्त मुलांच्या नावाने उघडता येणार.

  • मुलंच या योजनेचे लाभार्थी.

  • सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडात खातं उघडता येणार.

  • ई-एनपीएसद्वारे खातं उघडण्याची तरतूद.

  • योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही.

  • खात्यात जमा केलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याज मिळेल.

  • तीन वर्षानंतर 25 टक्के रक्कम शिक्षण, आजार यासाठी काढता येणार.

  • मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येईल.

  • मुल 18 वर्षाचं होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही.

कशी आहे NPS वात्सल्य योजना?

समजा वयाच्या 19 ते 60 वर्षापर्यंत मूलांनी त्यात दरमहा 1 हजार रुपये गुंतवले अशा प्रकारे एकूण 60 वर्षांच्या कालावधीत एनपीएस वात्सल्य योजनेत 7 लाख 20 हजारांची गुंतवणूक. तर तुम्हाला जवळपास 3 कोटी 76 लाखांचं व्याज मिळणार. अशाप्रकारे तुमचा एकूण कॉर्पस 3 कोटी 83 लाख रुपये होईल.

तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना
Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

समजा वयाच्या 60 व्या वर्षांनंतर तुमच्या मुलांनी NPS वात्सल्य खात्यातील सर्व पैसे अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवून पेन्शन घेतलं असं समजू. त्या प्लॅनमधील व्याजदर फक्त 5-6 % असला तरी तुमच्या मुलांना वर्षाला फक्त 19 ते 22 लाखांचं व्याज मिळेल. म्हणजेच दरमहा दीड ते 2 लाख रुपये पेन्शन म्हणून मिळेल.

या योजनेत आई-वडील मुलांच्या निवृत्ती निधीसाठी बचत सुरु करू शकतात. त्यामुळे तुमच्या पाल्याच्या भविष्याची चिंता दूर करण्यासाठी आजच या योजनेत पैसे गुंतवू शकता. मात्र या योजनेचे सर्व दस्तऐवज वाचून आणि नियम अटी समजूनच पैशांची गुंतवणूक करा आणि पाल्याचं भविष्य सुरक्षित करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com