जर तुम्हालाही एखाद्या चांगल्या ठिकाणी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, जिथून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या एका उत्तम पर्यायाबद्दल सांगणार आहोत. जिथे गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षांत एक कोटी रुपये जमा करू शकता.
आम्ही ज्या योजेनबद्दल बोलत आहोत ती योजना आहे भारत सरकारची सार्वजनिक 'भविष्य निर्वाह निधी योजना'. पीपीएफ योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात गुंतवलेले तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना देशात खूप लोकप्रिय आहे. अनेक लोक या गुंतवणुकीच्या क्षेत्रात आपले पैसे गुंतवत आहेत.
सध्या पीपीएफ योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला सुमारे 7.1 टक्के व्याज मिळत आहे. यातच 12,500 रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटींहून अधिक निधी जमा करू शकतात. ते कसं, हेच आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत...
सर्वातआधी तुम्हाला पीपीएफ योजनेत तुमचे खाते उघडावे लागेल. खाते उघडल्यानंतर तुम्हाला दरमहा 12,500 रुपये वाचवावे लागतील आणि दरवर्षी 1.5 लाख रुपये या योजनेत गुंतवावे लागतील.
ही गुंतवणूक तुम्हाला पीपीएफ योजनेत पूर्ण 25 वर्षांसाठी करावी लागेल. जर सध्याच्या 7.1 टक्के व्याजदराच्या आधारे गणना केली, तर मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्याकडे सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी असेल.
या पैशाच्या मदतीने तुम्ही तुमच्या भविष्याशी संबंधित महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करू शकाल. याशिवाय तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जगू शकाल. पीपीएफ योजने गुंतवणूक केल्यानंतर 15 वर्षानंतर ही योजना मॅच्युर होते. याशिवाय मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी आणखी पाच वर्षांसाठी वाढवू शकता. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.