
शिक्षण हे आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकजण शिक्षणाने खूप यशस्वी होऊ शकतो.कोणत्याही प्रकारचे शिक्षण हे कधीच वाया जात नाही, असं सांगितले जाते.याच शिक्षणाच्या जोरावर तुम्ही खूप मोठी उंची गाठू शकतात. असंच काहीसं आदित्य श्रीवास्तव यांच्यासोबत झालं. त्यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षेत टॉप केले आहे.
आदित्य श्रीवास्तव हे मूळचे लखनऊचे रहिवासी.त्यांनी यूपीएससी परीक्षेत पहिली रँक प्राप्त केली. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण लखनऊमधून केले. आदित्य हे लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक केले. त्यानंतर एमटेकदेखील केले.
आदित्य श्रीवास्तव यांनी बेंगळुरुमध्ये एका एमएनसी कंपनीत नोकरीदेखील मिळाली.लाखो रुपयांची नोकरी असतानाही त्यांनी सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०२० मध्ये नोकरी सोडली आणि स्पर्धा परीक्षेची तयारी केली. २०२२ मध्ये यूपीएससीमध्ये २३६ रँक मिळली. त्यांची आयपीएस पदावर निवड झाली.
आदित्य श्रीवास्तव (UPSC Topper Aditya Shrivastava) यांचे वडील सेंट्रल ऑडिट डिपार्टमेंटमध्ये एएओ पदावर कार्यरत आहे. त्यांची लहान बहीणदेखील सिविल सर्व्हिसची तयारी करत आहे. आदित्य यांची पहिली आयपीएस म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि १ रँक मिळवली.
मिडिया रिपोर्टनुसार, आदित्य यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवले आहे. लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी असतानाही त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. आज ते आयएएस पदावर कार्यरत आहेत.
यूपीएससी (UPSC) ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करावा लागतो. अनेकदा आपल्याला अपयश मिळते. परंतु कितीही अपयश मिळाले तरीही प्रयत्न सोडायचे नसतात. आयएएस आदित्य श्रीवास्तव यांनी एकदा नाही तर दोनदा यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.