सांगली : शेतातून यशस्वी प्रयोग करून अनेक शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. अर्थात पारंपरिक शेतीला फाटा देत हे उत्पन्न घेतले जात आहे. अशाच प्रकारे एका सतरा वर्षीय शेतकऱ्याने १५ एकर क्षेत्रात डाळींब लागवड करून उत्पादन घेतले आहे. यातून साधारण ७० टन डाळींब उत्पादन घेत वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न घेत आहेत.
सांगलीच्या आटपाडी येथील १७ वर्षीय शुभम मरगळे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला डाळिंब पिक शेती वरदान ठरली आहे. कमी पाण्यात शेतकऱ्यांना अधिकच उत्पादन देणारे पीक म्हणून डाळिंबाच्या शेतीकडे पाहिले जाते. पण या शेतीला देखील अलीकडच्या काळात वेगवेगळी आव्हाने निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी आणि आत्महत्याग्रस्त देखील झाले आहेत.
वडील आणि काकांचे मार्गदर्शन
अशा परिस्थिती देखील आटपाडी मधील अवघ्या १७ वर्षाच्या शुभम मरगळे या तरुण शेतकऱ्याने एक दोन नव्हे तर तब्बल १५ एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग फुलवली आहे. या १५ एकर क्षेत्रात तब्बल ४ हजार झाडे आहेत. त्यामुळे शुभमला यंदा ७० टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले आहे. वडील आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने ही किमया करून दाखवली आहे.
निव्वळ नफा ७ लाख रुपये
शुभमनं पिकवलेल्या डाळिंबाला प्रतिकिलोला २२५ रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. यातून जवळपास मरगळे कुटुंबाला वार्षिक १ कोटीहून उत्पन्न मिळाले आहे. तर यातून निव्वळ नफा ७ लाख रुपयांचा मिळाला आहे. शुभमने केलेल्या डाळिंब शेतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. योग्य नियोजनातून हे सर्व शक्य होत असल्याचे शुभम मरगळे याने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.