Income Tax: नवरा- बायको दोघांनाही एकत्र ITR फाइल करता येणार; ICAI चा सरकारसमोर प्रस्ताव

Married Couple Income Tax Policy: उद्या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटटंने जॉइंट टॅक्सेशन फॉर मॅरिड कपल लागू करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला आहे.
Income Tax
Income TaxCanva
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

उद्या अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन उद्या टॅक्सबाबत मोठी घोषणा करु शकतात. कदाचित उद्या टॅक्स स्लॅबमध्ये सूट मिळण्याची शक्यता आहे. टॅक्समध्ये सूट मिळाल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, त्याआधी इन्कम टॅक्स रिटर्न करण्याबाबत दोन महत्त्वाचे प्रस्ताव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट यांनी सरकारसमोर ठेवले आहे.

याबाबत सीए अनिरुद्ध राठे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, सरकारसमोर दोन महत्त्वाचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. त्यातील एक म्हणजे जॉइंट टॅक्सेशन फॉर मॅरेज कपल. म्हणजेच लग्न झालेल्या कपलला आता एकत्र आयटीआर फाइल करता येणार आहे. याआधी नवरा आणि बायको दोघेही वेगवेगळे आयटीआर फाइल करायचे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर पती आणि पत्नी या दोघांचेही उत्पन्न एकत्र करुन त्यांना एकाच टॅक्स स्लॅबअंतर्गत कर भरावा लागेल.

Income Tax
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात कर कपातीवर होणार निर्णय, मध्यमवर्गीयांना मोदी सरकार देणार मोठी भेट

यामध्ये वेगवेगळे टॅक्स स्लॅबदेखील तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यात ६ लाखांवर कोणताही टॅक्स लागणार आहे. ७ लाख ते १४ लाखांपर्यंत फक्त ५ टक्के टॅक्स भरावा लागेल. जर उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त असेल तर सध्या सर्चाज १० टक्के आहे. तर ही मर्यादा वाढवून १ कोटी केली जाऊ शकते.त्यामुळे जर तुमचे एकत्र उत्पन्न १ कोटी किंवा २ टक्के असेल तर १० टक्के सर्चाज लागेल. जॉइंट टॅक्सेशन कर प्रणाली ही परदेशात सुरु आहे. त्यामुळे लवकरच भारतात ही प्रणाली लागू केली जाऊ शकते.

Income Tax
Atal Setu Toll Tax : दिलासादायक! अटल सेतूवर वर्षभर टोलवाढ नाहीच, वाहनचालकांना किती टोल भरावा लागणार?

जॉइंट टॅक्सेशनचे फायदे

जर जॉइंट टॅक्सेशन फाइल केले तर नवरा बायको एकत्र आयटीआर फाइल करु शकणार आहे.

यामध्ये जर नवरा-बायकोमध्ये कोणाचे एकाचे उत्पन्न जास्त असेल तर त्या व्यक्तीवर कराचा जास्त भार असतो. त्यामुळे जर जॉइंट टॅक्स फाइल केला तर हा भार कमी होईल.

यामध्ये स्टँडर्ड टॅक्सेशन मिळणार आहे. यामध्ये नवरा- बायको दोघांनाही एकत्र किंवा वेगवेगळे आयटीआर फाइल करण्यासाठी ऑप्शन दिला जाईल. यामुळे करदात्यांना खूप फायदा होणार आहे.

Income Tax
Tax Free State: कोट्यवधी रुपये कमावले तरी भरावा लागत नाही एकही रुपया टॅक्स; भारतातील हे राज्य आहे करमुक्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com