Atal Setu Toll Tax : दिलासादायक! अटल सेतूवर वर्षभर टोलवाढ नाहीच, वाहनचालकांना किती टोल भरावा लागणार?

Atal Setu Toll Tax News : मागच्या वर्षी अटल सेतूवर कमीत कमी २५० रुपये टोल आकारला जात होता. आता पुढे वर्षभरही समान सवलतीच्या दरात टोलकर भरावा लागणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
Atal Setu Toll Tax News
Atal Setu Toll Tax NewsSaam Tv
Published On

Atal Setu Toll Tax Updates : अटल सेतूवर टोलदरवाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे वाहनधारकांना आत्ताप्रमाणे पुढील वर्षभर २५० रुपये टोल कर द्यावा लागणार आहे. मागच्या वर्षी जानेवारी २०२४ मध्ये एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दरात टोलकर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या टोलदर आकरणीसंबंधित निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये अटल सेतूवर प्रवास करणाऱ्यांसाठी कमीत कमी २५० रुपये टोल आकारण्याचे ठरले. या दराचा आढावा घेण्यासाठी आज (२८ जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या बैठकीमध्ये आणखी एक वर्ष म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सध्या सुरु असलेल्या सवलतीच्या दरात (२५० रुपये) टोलकर आकारण्यात यावा या निर्णयाला मान्यता देण्यात आली. टोलकर न वाढवण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयामुळे असंख्य वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Atal Setu Toll Tax News
Siddhivinayak Mandir : सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड! तोकड्या कपड्यांवर बंदी, दर्शन घेण्यासाठी पाळावा लागेल नियम

सुमारे २२ किमी लांब असलेल्या अटल सेतूचे लोकार्पण १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर १३ जानेवारीपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करण्यात आला. हा पूल मुंबईतील शिवडीला सुरु होतो. एलिफंटा बेटाच्या उत्तरेच्या ठाणे खाडीला ओलांडून न्हावा शेवाला पोहोचतो.

Atal Setu Toll Tax News
Walmik Karad : "मी बीड जिल्ह्याचा बाप..." वाल्मीक कराड आणि पोलिसांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com