Siddhivinayak Mandir : सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड! तोकड्या कपड्यांवर बंदी, दर्शन घेण्यासाठी पाळावा लागेल नियम

Dress Code in Siddhivinayak Ganapati Mandir : मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड ठेवण्याचा निर्णय ट्रस्टच्या सदस्यांनी एकमताने घेतला आहे. हा नियम पुढच्या आठवड्यापासून लागू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Dress Code in Siddhivinayak Ganapati Mandir
Dress Code in Siddhivinayak Ganapati MandirSaam Tv
Published On

Siddhivinayak Ganapati Mandir : मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यासंदर्भात मंदिर ट्रस्टने अधिकृत पत्रक प्रसिद्ध केला आहे. आता भाविकांनी ड्रेस कोड फॉलो केल्यानंतरच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. ही नियम पुढच्या आठवड्यापासून लागू करण्यात येणार आहे.

श्री सिद्धीविनायक मंदिर हे खूप लोकप्रिय देवस्थान आहे. देशभरातून हजारो भाविक मंदिराला भेट देऊन सिद्धीविनायकाचे दर्शन घेत असतात. मंदिरात येणाऱ्या काहीजणांचा पेहराव हा संकोच वाटणारा असतो, अशा तक्रारी मंदिराकडे सतत येत होत्या. त्यामुळे मंदिरात ड्रेस कोड लागू केला जावा अशी मागणी लोक करत होते. या मागणीला मान देत मंदिराने हा निर्णय घेतला आहे.

माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सिद्धीविनायक मंदिरात खास उत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या निमित्ताने मंदिराच्या ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत ड्रेस कोड संबंधित निर्णय एकमताने घेण्यात आला. या निर्णयानुसार पुरुष आणि महिला भाविकांना शॉर्ट्स किंवा तोकट्या कपड्यांमध्ये मंदिरात प्रवेश करता येणार नाही.

Dress Code in Siddhivinayak Ganapati Mandir
Pune Police: पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, वाचा संपूर्ण लिस्ट

प्रत्येक भक्ताने मंदिराचे पावित्र्य जपणारे कपडे परिधान करायला हवे, असे ट्रस्टने म्हटले आहे. आपल्या कपड्यांमुळे इतरांना संकोच वाटणार नाही याची काळजी भाविकांनी घ्यावी. दर्शन घेताना भारतीय परंपरेला साजेसे कपडे परिधान करावे. इतरांना संकोच वाटेल अशा कपड्यांवर, तोकड्या कपड्यांवर बंदी असल्याची माहिती ट्रस्टने दिली आहे. ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी ड्रेस कोड संबंधित नियम पुढच्या आठवड्यापासून लागू केला जाईल असे म्हटले आहे.

Dress Code in Siddhivinayak Ganapati Mandir
Pandharpur Vitthal Mandir : नवविवाहित जोडप्यांना मिळणार विठुरायाचे व्हीआयपी दर्शन; मंदिर समितीचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com