
बजेटमध्ये इन्कम टॅक्सबाबत अनेक घोषणा केली जाऊ शकते. दरवर्षी जुलै महिन्यात आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख असते. यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळू शकतो. प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आयटीआर फाइल करावा लागतो. त्यानंतर इन्कम टॅक्स भरावा लागतो. (Income Tax)
इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित १० लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नसल्याचे सांगितले जात आहे. आयटीआर फाइल न केल्यास दंड भरावा लागतो. परंतु भारतातील एक राज्य असे आहे की जिथे इन्कम टॅक्स भरावा लागत नाही.
तुमची कमाई कितीही जास्त असेल तरीही तुम्हाला कर भरावा लागत नाही. सिक्कीम हे भारतातील टॅक्स फ्री राज्य आहे. या राज्यात कोणीही टॅक्स भरत नाही.
सिक्किममधील मूळ रहिवासी जे लोक आहेत. जे लोक तिथेच जन्माला आले आहे त्यांना आयकरपासून सवलत मिळते. स्वातंत्र्यापासूनच हा नियम लागू करण्यात आले आहे. सिक्किम राज्य १९७५ रोजी भारतात विलीन केले होते. तेव्हाच या राज्याने सरकारपुढे एक अट ठेवली आहे. सिक्किम राज्याने जुना कायदा स्विकारयचा, अशी अट होती. सिक्कीम राज्यात विशेष दर्जा कायम ठेवण्यासाठी आयकर कलम १९१६ स्विकारण्यास नकार दिला होता. भारताने ही अट मान्य केली होती. त्यानंतर सिक्किम राज्य भारतात विलिन झाले. त्यामुळेच या राज्यात आयकर भरावा लागत नाही. (Income Tax Free State In India)
आयकर कायदा 1961 च्या कलम 10 (26AAA) अंतर्गत सिक्किम हे करमुक्त राज्य आहे. भारतीय संविधान कलम 371F अंतर्गत सिक्किमला विशेष दर्जा मिळाला आहे. सिक्किमच्या मूळ रहिवाशांनाच इन्कम टॅक्सपासून सवलत मिळते. (Sikkim Tax Free State In India)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.