Union Budget 2025 : अर्थसंकल्पात कर कपातीवर होणार निर्णय, मध्यमवर्गीयांना मोदी सरकार देणार मोठी भेट

Budget 2025 : १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण देशाचे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये वार्षिक १० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
Union Budget 2025
Union Budget 2025Saam Tv
Published On

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प २०२५ देशातील जनतेसमोर सादर करतील. यंदाच्या बजेटमध्ये नव्या कर प्रणालीमध्ये सरकार बदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवी कर प्रणाली डिफॉल्ट प्रणाली म्हणून सेट केली जाईल. म्हणजेच जर करदात्याने नव्या आणि जुन्या कर प्रणालीमधील कोणताही पर्याय निवडला नाही, तर तो आपोआप नवीन कर प्रणालीत जाईल. आयकर रिटर्न दाखल करताना करदाते त्यात बदल करू शकणार आहेत.

बिजनेस स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पात नव्या कर प्रणाली अंतर्गत, वार्षिक १० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले जाऊ शकते. याशिवाय १५ लाख ते २० लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नासाठी २५ टक्के नवीन कर स्लॅब लागू करण्याचा सरकारचा इरादा आहे. अशा आयकर सवलतीचा परिणाम म्हणून केंद्र सरकार ५०,००० कोटी ते १,००,००० कोटी रुपयांचे महसूल नुकसान सहन करण्यास तयार आहे.

सध्या नव्या कर प्रणालीच्या अंतर्गत, वार्षिक ७.७५ लाख रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्या पगारदार करदात्यांना ७५,००० रुपयांच्या मानक कपाती व्यतिरिक्त कोणताही कर द्यावा लागणार नाही. वार्षिक १५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न ३० टक्क्यांच्या उच्च टॅक्स स्लॅब अंतर्गत येते.

Union Budget 2025
What is Budget: बजेट म्हणजे काय? दरवर्षी अर्थसंकल्प का सादर केला जातो? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

ग्रँट थॉर्नटन इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, सरकारने पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात कर कपातीची घोषणा करावी अशी भारतातील ५७ टक्के करदात्यांची इच्छा आहे. ७२ टक्के करदात्यांनी नवी आयकर प्रणाली निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर ६३ टक्के करदाते जुन्या कर रचनेच्या बाजूने आहेत. सर्वेक्षणातील ४६ टक्के प्रतिसादकर्त्यांनी कर दर कमी करावी असे म्हटले आहे. तर २६ टक्के लोकांनी सूट मर्यादा वाढवली पाहिजे असे मानले आहे.

Union Budget 2025
Budget 2025: अर्थसंकल्पात महिलांना मिळणार मोठा दिलासा! महिला सन्मान योजनेत गुंतवणूकीला मुदतवाढ देण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com