वडिलोपार्जित जमिनीत तुमचा किती हक्क? आजोबांची जमीन स्वतःच्या नावावर कशी कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

How To Transfer Ancestral Land In Your Name in Maharashtra: वडिलोपार्जित जमिनीत तुमचा किती हक्क आहे? आजोबा किंवा वडिलांच्या नावावरील जमीन स्वतःच्या नावावर करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि फेरफार नोंदींबाबत जाणून घ्या.
HOW TO TRANSFER ANCESTRAL LAND IN YOUR NAME?
HOW TO TRANSFER ANCESTRAL LAND IN YOUR NAME?saam tv
Published On: 

वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा कसा करायचा? वडील-आजोबांच्या जमिनीत आपला हिस्सा स्वतःच्या नावावार कसा करून घ्यायचा? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतात. जर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर किंवा इतर महसूल नोंदीमध्ये आजही तुमच्या पूर्वजांचे नाव असेल आणि त्यांचे निधन झाले असेल, तर तुम्ही कायदेशीर वारस म्हणून जमिनीच्या नोंदीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकता.यासाठी काही महत्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. महाराष्ट्रात सातबारा उतारा आणि फेरफार नोंदींना विशेष महत्त्व आहे. चला तर मग, वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर करण्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, हे जाणून घेऊया.

HOW TO TRANSFER ANCESTRAL LAND IN YOUR NAME?
Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?

जमिनीशी संबंधित महत्वाची माहिती महसूल अभिलेखांमध्ये नोंदवली जाते. महाराष्ट्रात सातबारा उताऱ्यावर जमिनीचा गट क्रमांक किंवा सर्व्हे क्रमांक, क्षेत्रफळ, नोंदवलेले खातेदार, पिकांची माहिती आणि इतर संबंधित तपशील उपलब्ध असू शकतात.

HOW TO TRANSFER ANCESTRAL LAND IN YOUR NAME?
Petrol Price Hike : दिवाळीआधी इंधनाचा भडका! पेट्रोल-डिझेल महागणार? निवडणुकांआधी सर्वसामान्यांना बसणार शॉक

वडिलोपार्जित जमीन स्वतःच्या नावावर कशी करायची?

वडील, आजोबा किंवा इतर पूर्वजांच्या नावावर जमीन असल्यास आणि त्यांचे निधन झाले असल्यास वारसांना महसूल नोंदीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येऊ शकतो. यासाठी काही प्रकिया पूर्ण करावी लागते.

1 जमिनीच्या नोंदी तपासा

सर्वप्रथम संबंधित जमिनीचा सातबारा उतारा, आठ-अ उतारा आणि उपलब्ध फेरफार नोंदी तपासा. जमिनीचा गट क्रमांक, क्षेत्रफळ आणि सध्या नोंदवलेल्या खातेदाराचे नाव यांची खात्री करून घ्या.

2 आवश्यक कागदपत्रे गोळा करा

जमिनीच्या नोंदीतील नाव असलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, वारसांशी संबंधित पुरावे आणि जमिनीची जुनी कागदपत्रे तयार ठेवा. प्रकरणानुसार वारस प्रमाणपत्र, वंशावळ, प्रतिज्ञापत्र किंवा इतर कागदपात्रांचीही आवश्यकता असू शकते.

3. संबंधित कार्यालयात अर्ज करा

महाराष्ट्रात जमिनीच्या प्रकारानुसार आणि उपलबद्ध सुविधेनुसार संबंधित तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा अधिकृत ऑनलाइन प्राणलीच्या माध्यमातून फेरफारासाठी अर्ज करता येतो. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.

4. कागदपात्रांची पडताळणी पूर्ण करा

अर्ज प्राप्त झाल्यानंतर महसूल अधिकारी कागदपात्रांची तपासणी करू शकतात. आवश्यकतेनुसार इतर कायदेशीर वारसांना नोटिस दिली जाऊ शकते किंवा त्यांचे म्हणणे आणि हरकती मागवल्या जाऊ शकतात.

5. फेरफार नोंदी तपासा

अर्ज मंजूर झाल्यानंतर जमिनीच्या महसूल नोंदीमध्ये आवश्यक बदल केले जातात. त्यानंतर सातबारा उतरा आणि जमिनीचा तपशील योग्य असल्याची खात्री करा.

HOW TO TRANSFER ANCESTRAL LAND IN YOUR NAME?
Tesla Roadster : टेस्लाची नवी भरारी! बहुप्रतिक्षित 'रोडस्टर' इलेक्ट्रिक कार अखेर लाँच, एका सेकंदात 97किमी अंतर करणार पार

वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

जमिनीचे नावांतरण किंवा फेरफार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे राज्यातील नियम आणि संबंधित प्रकरणानुसार बदलू शकतात. सामान्यतः पुढील कागदपत्रे मागितली जाऊ शकतात.

सातबारा उतारा किंवा जमिनीच्या नोंदी: संबंधित जमिनीचा गट क्रमांक, क्षेत्रफळ आणि नोंदवलेल्या खातेदाराची माहिती तपासण्यासाठी

जुनी मालकीची कागदपत्रे: जमीन पूर्वजांच्या नावावर कशी आली, याची माहिती मिळवण्यासाठी.

मृत्यू प्रमाणपत्र: मूळ खातेदाराच्या निधनाची अधिकृत नोंद सिद्ध करण्यासाठी.

वारसांशी संबंधित कागदपत्रे: अर्जदाराचा मृत व्यक्तीशी असलेला संबंध आणि वारसाहक्क तपासण्यासाठी.

ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा: अर्जदाराची ओळख निश्चित करण्यासाठी

वंशावळ किंवा वारस प्रमाणपत्र: संबंधित प्रकरणात मागणी केल्यास वारसांची माहिती पडताळण्यासाठी

मृत्युपत्र किंवा वाटणीपत्र: दावा मृत्युपत्रावर किंवा झालेल्या कायदेशीर वाटणीवर आधारित असल्यास.

फेरफार अर्ज आणि शुल्काची पावती: संबंधित प्रक्रियेसाठी अर्ज केल्याचा पुरावा म्हणून.

प्रत्येक प्रकरणात ही सर्व कागदपत्रे आवश्यक असतीलच असे नाही. अर्ज करण्यापूर्वी संबंधित तलाठी किंवा तहसील कार्यालयातून कागदपत्रांची अधिकृत यादी जाणून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com