रॉकेट तंत्रज्ञानाचे थ्रस्टर्स
टेस्ला रोडस्टर कार तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार रस्त्यावर धावण्यासोबतच हवेत उडण्याचीही क्षमता ठेवते. या कारच्या मागील बंपरजवळ चार नोजल बसवण्यात आले आहेत, जे या कारला हवेत लांब उडी मारण्याची शक्ती देतात. या कारमध्ये चालण्यासाठी टायर्स आणि उडण्यासाठी रॉकेटसारखे तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
टेस्ला रोडस्टर ही एक इलेक्ट्रिक कार असताना ती रॉकेट इंजिनसारखा थ्रस्ट कसा निर्माण करत आहे? याचे उत्तर कारच्या मागील सीटखाली असलेल्या एका गोलाकार सिलिंडरमध्ये दडलेले आहे. मात्र, डेमोमध्ये दाखवलेले स्टंट्स प्रत्यक्षात येणाऱ्या खऱ्या कार्स करू शकतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला रोडस्टरच्या आत असलेल्या या सिलिंडरला 'COPV' म्हणजेच कंपोझिट ओव्हर्रॅप्ड प्रेशर व्हेसल असे नाव देण्यात आले आहे. या प्रकारचे तंत्रज्ञान आणि सिलिंडर सिस्टीम बनवणारी कंपनी 'हेक्सगॉन मास्टरवर्क' स्पेसएक्सने काही काळापूर्वी विकत घेतली होती, ज्याचा फायदा टेस्लाला मिळाला आहे. स्पेसएक्सच्या रॉकेटमध्येही COPV चा वापर केला जात आहे.
टेस्लाच्या उडणार्या कारचा व्हिडिओ व्हायरल
रिपोर्ट्सनुसार, सीटखाली बसवलेला हा सिलिंडर उच्च दाबाची हवा निर्माण करतो, ज्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण काही प्रमाणात जास्त असते. या उच्च दाबाच्या हवेच्या बळावरच कार हवेत उंच उडी मारू शकते आणि आपले संतुलन राखू शकते, जसे की टेस्लाच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहे.
रॉकेटसारखी पॉवर
COPV च्या आत प्रेशर साठवून ठेवला जातो आणि तो नियंत्रितही केला जातो. याचा आकार एखाद्या मोठ्या व्यायामाच्या चेंडूसारखा असतो. याचा दाब १० हजार पीएसआय पर्यंत असू शकतो आणि याची क्षमता सुमारे २०० लिटरपर्यंत आहे. तसेच ही कार एका सेकंदात 97किमी अंतर पार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
COPV तंत्रज्ञान
COPV हे कोणतेही नवीन तंत्रज्ञान नाही, परंतु एखाद्या कारमध्ये याचा अशा प्रकारे वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.सुरुवातीच्या काळात अशा प्रकारचे टँक स्टिलपासून बनवले जात होते, त्यानंतर त्यात ॲल्युमिनियम आणि नंतर टायटॅनियमचाही वापर करण्यात आला. OPV सारखे टँक अत्यंत हलके आणि मजबूत बनवले जातात, जे नंतर नासाने अतिशय खास पद्धतीने तयार केले होते.COPV दोन पाईप्सद्वारे चार नोजल्सना जोडलेले असते. हा सिलिंडर वेगाने हवेचा दाब तयार करतो, जो चार नोजल्सद्वारे बाहेर फेकला जातो. त्यानंतर हा हवेचा प्रेशर कारला उडण्यास मदत करतो.
टेस्लाची पहिली रोडस्टर कार 2008 मध्ये लॉन्च झाली आणि 2012 मध्ये तिचे उत्पादन बंद करण्यात आले. नवीन मॉडेलचा एक प्रोटोटाइप 2017 मध्ये दाखवण्यात आला होता, परंतु विविध कारणांमुळे त्याला विलंब झाला. या नवीन उडणाऱ्या टेस्ला रोडस्टर सुपरकारचे उत्पादन 2028 मध्ये सुरू होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.