Good News : मोठी बातमी !एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा

MSRTC employees Salary 2026 : महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला ३९१.०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
MSRTC Employees Diwali Salary 2026
MSRTC Employees Diwali Salary 2026saam tv
Published On: 

साम प्रतिनिधी, सूरज मसूरकर

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी वेतन मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला सप्टेंबर २०२६ मधले प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी ३९१ कोटी २ लाख रुपयांचा निधी वितरित करायला मंजुरी दिली आहे. यासंदर्भातले शासन निर्णय २७, ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आला. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचं मानलं जात आहे.

दिवाळीआधी वेतन देण्यासाठी प्रयत्न

एसटी महामंडळातल्या सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणपणे दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान दिले जाते. यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळावे, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

MSRTC Employees Diwali Salary 2026
Divyang Pension : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग पेन्शनसाठी 80% ची अट हटवली; जाणून घ्या नवे नियम

कर्मचाऱ्यांची दिवाळी आर्थिक अडचणींशिवाय साजरी व्हावी, यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्याकरिता परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने निधी वितरणाला मंजुरी दिली आहे.

MSRTC Employees Diwali Salary 2026
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹३,००० मिळणार? सप्टेंबर - ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

प्रवासी सवलींच्या प्रतिपूर्तीसाठी निधी

एसटी महामंडळाकडून महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिकांसाठीच्या सवलती आणि इतर प्रवासी सवलतींची अंमलबजावणी केली जाते. “एसटी ही महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या सेवेला अहोरात्र कार्यरत ठेवणारे अधिकारी आणि कर्मचारी हे महामंडळाचे खरे बळ आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी आनंदाने साजरी करता यावी, यासाठी कर्मचाऱ्यांना सणापूर्वी वेतन मिळावे, हा आमचा प्रयत्न आहे,” अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली. शासनाच्या या निर्णयामुळे दिवाळीआधी वेतन देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता एसटी प्रशासन वेतन वितरणाची प्रोसेस किती लवकर पूर्ण करते, याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com