Divyang Pension : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग पेन्शनसाठी 80% ची अट हटवली; जाणून घ्या नवे नियम

Central Government Scheme : दिव्यांग पेन्शनधारकांच्या पेन्शनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वयोमर्यादा, मासिक अर्थसहाय्य, पात्रता आणि नवीन नियमांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Divyang Pension Yojana
Divyang Pension Yojanasaam tv
Published On: 

दिव्यांग व्यक्तींसाठी पेन्शन आणि आर्थिक मदतीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. ‘आपले सरकार’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, दिव्यांगत्त्वाची टक्केवारी, लाभार्थ्यांचं वय आणि मिळणारे अर्थसहाय्य याबाबत तपशील देण्यात आले आहेत. या माहितीनुसार, पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला ३७५ रुपये, तर ८० वर्षे आणि त्यावरील पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला ६२५ रुपये अर्थसहाय्य दिलं जात असल्याचं नमूद आहे.

तसेच दिव्यांग पेन्शनसाठी ८० टक्क्यांऐवजी ४० टक्के दिव्यांगत्वाची अट सर्व योजनांसाठी लागू झाली आहे का, याची संबंधित योजनेच्या अधिकृत शासन निर्णयातून खात्री करणं आवश्यक आहे. फक्त पोस्टरवरच्या माहितीच्या आधारे सर्व लाभार्थ्यांना हा बदल लागू झाल्याचं गृहीत धरू नये.

Divyang Pension Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹३,००० मिळणार? सप्टेंबर - ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

दिव्यांग पेन्शनसाठी ४० टक्के दिव्यांगत्त्वाची अट, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठीच्या पेन्शन योजनेत महत्त्वाचे बदल केलेला आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिव्यांग पेन्शनसाठीची दिव्यांगत्वाची मर्यादा ८० टक्क्यांवरून ४० टक्के करण्यात मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे अधिक दिव्यांग व्यक्तींना पेन्शन योजनेच्या कक्षेत येण्याची संधी मिळणार आहे.

Divyang Pension Yojana
Ration Card Update: तुमचे रेशन कार्ड सुरू आहे की बंद, कसं तपासाल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

जन्मापासून मिळूणार लाभ

याआधी या केंद्रीय योजनेत पेन्शनसाठी वयोमर्यादा १८ वर्षे होती. नव्या निर्णयानुसार ही अट काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र दिव्यांग व्यक्तींना जन्मापासून या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, यासाठी दिव्यांगत्त्वाचे अधिकृत प्रमाणपत्र आणि योजनेच्या इतर पात्रता अटी पूर्ण करणं आवश्यक असेल.

दरमहा किती मिळणार अर्थसहाय्य?

‘आपले सरकार’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टवरच्या माहितीतही या अर्थसहाय्याच्या तपशिलांचा उल्लेख करण्यात आलाय. केंद्र सरकारच्या घोषणेनुसार, वयोगटानुसार अर्थसहाय्य पुढीलप्रमाणे असेल.

० ते ७९ वर्षे - पात्र लाभार्थ्यांना दरमहा ३७५ रुपये

८० वर्षे आणि त्यावरील: पात्र लाभार्थ्यांना दरमहा ६२५ रुपये. ही रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. राज्य सरकारकडून मिळणारे जास्तीचे अनुदान संबंधित राज्याच्या योजनेनुसार वेगळं असू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com