

रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी जाण्याआधी तुमचं रेशन कार्ड सक्रिय आहे की नाही, हे तपासून घेणं महत्त्वाचं आहे. रेशन कार्ड निष्क्रिय असल्यावर किंवा कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची ई-केवायसी अपूर्ण असेल तर धान्य मिळवताना अडचणी येऊ शकतात. पण यासाठी प्रत्येक वेळी रेशन दुकानात जाण्याची गरज नाही. मोबाईलवर असलेल्या अधिकृत डिजिटल सेवांच्या मदतीने रेशन कार्डाची माहिती तपासता येते. त्यासाठी कोणती प्रोसेस करावी, जाणून घ्या.
रेशन कार्ड किंवा त्यावरच्या सदस्यांची नोंद निष्क्रिय होण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो.
दीर्घकाळ धान्य न घेणं - काही प्रकरणांमध्ये सलग सहा महिने रेशन न घेतल्याने पडताळणी होऊ शकतं. पण फक्त धान्य घेतलं नाही त्यामुळे प्रत्येक कार्ड आपोआप बंद होतंच असं नाही.
ई-केवायसी अपूर्ण असणं - कुटुंबातल्या सदस्यांची ओळख पडताळणी पूर्ण नसेल तर संबंधित नोंदी अपडेट करण्याची गरज भासू शकते.
आधार सीडिंगची समस्या - आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडलेला नसेल तर किंवा पडताळणीत अडचण आल्यावर लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
दुबार नोंद - एकाच व्यक्तीचं नाव दोन रेशन कार्डांवर असल्यास संबंधित नोंदींची पडताळणी केली जाऊ शकते.
रेशन कार्डाची माहिती तपासण्यासाठी पुढच्या स्टेप्स फॉलो करता येऊ शकतात.
१. सर्वप्रथम मोबाईलमध्ये केंद्र सरकारचे अधिकृत UMANG ॲप उघडा.
२.ॲपमध्ये लॉगिन करून सर्च बारमध्ये ‘Mera Ration’ किंवा ‘PDS’ हा पर्याय शोधा.
३. उपलब्ध सेवांमध्ये महाराष्ट्र राज्य निवडा.
४. रेशन कार्डचे तपशील पाहण्याचा पर्याय उपलब्ध असल्यास आवश्यक माहिती भरा.
५. कार्ड आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंधित उपलब्ध नोंदी तपासा.
रेशन कार्डावरच्या एखाद्या सदस्याचे आधार सीडिंग किंवा ई-केवायसी अपूर्ण असेल तर संबंधित रास्त भाव दुकानात संपर्क साधा. आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जा. अशा सुविधेनुसार -पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी किंवा इतर निर्धारित प्रोसेसच्या मदतीने ई-केवायसी पूर्ण करता येते. पडताळणी झाल्यावर नोंदी अपडेट व्हायला वेळ लागू शकतो. प्रोसेस पू्र्ण झाल्यावर संबंधिक सदस्याची स्थिती परत तपासा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.