DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ, लेव्हल 1 ते 10 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

Dearness Allowance Hike: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ मंजूर केली असून भत्ता ६३ टक्क्यांवर पोहोचला आहे. लेव्हल १ ते १० मधील कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार, वाढ कधीपासून लागू होईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार का, जाणून घ्या.
DA Hike 2026
DA Hike 2026saam tv
Published On: 

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिलीये. 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना 60 टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता त्यात 3 टक्क्यांची वाढ झाल्याने हा भत्ता 63 टक्के झालाय.

या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या पगारात किती फरक पडणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या वेतन स्तरांवरील म्हणजेच लेव्हल 1 ते लेव्हल 10 मधील कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार, हे जाणून घेऊया.

DA Hike 2026
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी होणार? फिटमेंट फॅक्टर ४ ची चर्चा, पगार किती वाढणार?

महागाई भत्त्यातील वाढीमुळे पगार किती वाढणार?

केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगारानुसार वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 30 हजार रुपये असेल तर 63 टक्के दराने त्याला 18 हजार 900 रुपये महागाई भत्ता मिळणार आहे. त्यामुळे मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून त्याची रक्कम 48 हजार 900 रुपये होणार आहे. मात्र महागाई भत्त्यातील या वाढीमुळे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारात होणारी वाढ त्याच्या मूळ वेतनावर अवलंबून असेल.

लेव्हल 1 ते लेव्हल 10 मधील कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?

लेव्हल 1

या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 18 हजार रुपये आहे. महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढल्यामुळे दर महिन्याला 540 रुपयांची वाढ होईल. 63 टक्के दराने त्यांना 11 हजार 340 रुपये महागाई भत्ता मिळेल.

लेव्हल 2

या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 19 हजार 900 रुपये आहे. त्यांच्या पगारात दर महिन्याला 597 रुपयांची वाढ होईल. त्यांना 12 हजार 537 रुपये महागाई भत्ता मिळेल.

लेव्हल 3

या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 21 हजार 700 रुपये आहे. त्यांच्या पगारात दर महिन्याला 651 रुपयांची वाढ होईल. त्यांना 13 हजार 671 रुपये महागाई भत्ता मिळेल.

लेव्हल 4

या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 25 हजार 500 रुपये आहे. त्यांच्या पगारात दर महिन्याला 765 रुपयांची वाढ होईल. त्यांना 16 हजार 65 रुपये महागाई भत्ता मिळेल.

लेव्हल 5

या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 29 हजार 200 रुपये आहे. त्यांच्या पगारात दर महिन्याला 876 रुपयांची वाढ होईल. त्यांना 18 हजार 396 रुपये महागाई भत्ता मिळेल.

लेव्हल 6

या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 35 हजार 400 रुपये आहे. त्यांच्या पगारात दर महिन्याला 1 हजार 62 रुपयांची वाढ होईल. त्यांना 22 हजार 302 रुपये महागाई भत्ता मिळेल.

लेव्हल 7

या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 44 हजार 900 रुपये आहे. त्यांच्या पगारात दर महिन्याला 1 हजार 347 रुपयांची वाढ होईल. त्यांना 28 हजार 287 रुपये महागाई भत्ता मिळेल.

DA Hike 2026
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढला?

लेव्हल 8

या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 47 हजार 600 रुपये आहे. त्यांच्या पगारात दर महिन्याला 1 हजार 428 रुपयांची वाढ होईल. त्यांना 29 हजार 988 रुपये महागाई भत्ता मिळेल.

लेव्हल 9

या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 53 हजार 100 रुपये आहे. त्यांच्या पगारात दर महिन्याला 1 हजार 593 रुपयांची वाढ होईल. त्यांना 33 हजार 453 रुपये महागाई भत्ता मिळेल.

लेव्हल 10

या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 56 हजार 100 रुपये आहे. त्यांच्या पगारात दर महिन्याला 1 हजार 683 रुपयांची वाढ होईल. त्यांना 35 हजार 343 रुपये महागाई भत्ता मिळेल.

DA Hike 2026
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना दिवाळीआधीच हप्ता मिळणार, खात्यात १५०० येणार की ३००० रुपये; महत्त्वाची अपडेट आली समोर

महागाई भत्त्यातील वाढ कधीपासून लागू होणार?

केंद्र सरकारने महागाई भत्त्यात केलेली ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुलैपासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळेल.

मात्र हा निर्णय केवळ केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही ही वाढ मिळणार का याचा निर्णय संबंधित राज्य सरकारांना घ्यावा लागेल. त्यामुळे राज्य सरकारे महागाई भत्त्यातील 3 टक्क्यांची वाढ लागू करणार की नाही, हे त्यांच्या निर्णयावर अवलंबून असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com