8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी होणार? फिटमेंट फॅक्टर ४ ची चर्चा, पगार किती वाढणार?

Fitment Factor : कर्मचारी संघटनांकडून ३.८३ ते ४ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात आहे. मात्र अंतिम निर्णय झालेला नाही.
8th Pay Commission
8th Pay Commissionsaam tv
Published On: 

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची चर्चा सुरू आहे. या आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या सर्वात जास्त चर्चा फिटमेंट फॅक्टरची आहे. काही कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर ३.८३ किंवा ४ पर्यंत ठेवण्याची मागणी केली आहे. पण सरकार याबाबत नेमका काय निर्णय घेणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या मूळ पगारावर गुणाकार करून नवीन मूळ पगार मोजण्यासाठी वापरला जाणार गुणक. सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. आता आठव्या वेतन आयोगात हा गुणक किती असेल, याची उत्सुकता आहे.

8th Pay Commission
Bank Holidays November: नोव्हेंबरमध्ये बँका तब्बल १६ दिवस बंद! दिवाळी, भाऊबीज ते गुरु नानक जयंती, एका क्लिकवर पाहा संपूर्ण सुट्टीची यादी

काही कर्मचारी संघटनांनी ३.८३ ते ४ पर्यंत फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. दुसरीकडे, काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार तो १.८३ ते २.५७ दरम्यान असू शकतो. हे सर्व अंदाज असून अंतिम निर्णय अजून झालेला नाही.

8th Pay Commission
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ८१ लाख महिलांना पुन्हा ₹१५०० मिळणार?

फिटमेंट फॅक्टरनुसार पगार किती होऊ शकतो?

सध्या केंद्र सरकरी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार १८,००० रुपये आहे. त्यावर वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर लागू केल्याने नवीन मूळ पगाराचे गणित पुढीलप्रमाणे असेल.

१.८३ फिटमेंट फॅक्टर - ३२,९४० रुपये

२.०० फिटमेंट फॅक्टर - ३६,००० रुपये

२.५७ फिटमेंट फॅक्टर - ४६,२६० रुपये

३.८३ फिटमेंट फॅक्टर - ६८,९४० रुपये

४.०० फिटमेंट फॅक्टर - ७२,००० रुपये

हे फक्त गणितावर आधारित अंदाज आहेत. प्रत्यक्ष पगारवाढ ठरवताना वेतन आयोगाच्या शिफारशी, महागाई भत्ता आणि इतर नियम विचारात घेतलं जाऊ शकतात.

आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी कधी येणार?

आठव्या वेतन आयोगाची स्थापना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आली. दिलेल्या माहितीनुसार, आयोगाला शिफारशी सादर करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत आहे. त्यामुळे मे २०२७ पर्यंत अहवाल सादर होण्याची अपेक्षा आहे.

कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी किती वाट पाहावी लागणार?

आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर केंद्र सरकार त्यावर विचार करून अंतिम निर्णय घेईल. त्यानंतरच नवीन वेतनरचना कधीपासून लागू होणार, हे स्पष्ट होईल. अंमलबजावणीसाठी जास्त वेळ लागल्यावर प्रत्यक्ष लाभ मिळण्यास उशीर होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com