Bank Holidays November: नोव्हेंबरमध्ये बँका तब्बल १६ दिवस बंद! दिवाळी, भाऊबीज ते गुरु नानक जयंती, एका क्लिकवर पाहा संपूर्ण सुट्टीची यादी

Bank Holidays Diwali 2026 Date : नोव्हेंबर २०२६ मध्ये दिवाळी, भाऊबीज, पाडवा आणि गुरू नानक जयंतीमुळे काही राज्यांत बँका बंद राहू शकतात.
November 2026 Bank Holidays
November 2026 Bank Holidayssaam tv
Published On: 

नोव्हेंबर २०२६ मध्ये बँकेत जाऊन महत्त्वाची कामं करण्याचा विचार करत असाल, तर आधी सुट्ट्यांचं वेळापत्रक तपासून घ्या. दिवाळी, गोवर्धन पूजा, भाऊबीज, छट पूजा आणि गुरु नानक जयंती यांसारख्या सणांमुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. तसेच रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या नियमित सुट्ट्यांचाही समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेत जाण्याआधी योग्य नियोजन करणं आवश्यक आहे.

नोव्हेंबरमध्ये बँकांच्या सुट्टया कधी असतील?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये पुढच्या तारखांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांच्या शाखा बंद राहू शकतात.

९ नोव्हेंबर - दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि गोवर्धन पूजेनिमित्त काही ठिकाणी बँकांना सुट्टी.

१० नोव्हेंबर - बाली प्रतिपदा आणि विक्रम संवत नववर्षानिमित्त अहमदाबाद, मुंबई, नागपूरसह काही शहरांमध्ये सुट्टी.

११ नोव्हेंबर - भाऊबीज आणि स्थानिक सणांमुळे गंगटोक, कोलकाता, लखनऊसह काही शहरात बँका बंद.

१३ नोव्हेंबर - वांगला सणानिमित्त शिलाँगमध्ये सुट्टी.

November 2026 Bank Holidays
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ८१ लाख महिलांना पुन्हा ₹१५०० मिळणार?

१६ नोव्हेंबर - छठ जेनिमित्त पटना आणि रांची येथे बँका बंद.

२० नोव्हेंबर - इगास-बग्वाल सणानिमित्त डेहराडूनमध्ये सुट्टी.

२३ नोव्हेंबर - सेंग कुट स्नेमनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद.

२४ नोव्हेंबर - गुरु नानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमेनिमित्त अनेक शहरांत सुट्टी.

२७ नोव्हेंबर - कनकदास जयंतीनिमित्त बेंगळुरूमध्ये बँका बंद.

November 2026 Bank Holidays
Kadboli Recipe : दिवाळीत चकली-चिवडा कशाला! यंदा बनवा कुरकुरीत कडबोळी, एकदा खाल तर हात थांबणारच नाही

रविवार आणि शनिवारच्या सुट्ट्याही लक्षात घ्या

नोव्हेंबर महिन्यात १,८,१५, २२ आणि २९ नोव्हेंबर रोजी रविवार असल्यामुळे बँकांच्या शाखा बंद राहतील. तसेच १४ नोव्हेंबर हा दुसरा शनिवार आणि २८ नोव्हेंबर हा चौथा शनिवार असल्यामुळे या दिवशीही नियमित बँकिंग सेवा बंद असतील.

बँका बंद असल्या तरी ऑनलाइन सेवा सुरू

बँकांच्या शाखांना सुट्टी असली, तरी UPI, ATM, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग या डिजिटल सेवा नियमित सुरू असतील. मात्र, चेक क्लिअरन्ससाठी शाखेत जावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com