Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना दिवाळीआधीच हप्ता मिळणार, खात्यात १५०० येणार की ३००० रुपये; महत्त्वाची अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana September Installment Update: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट मिळणार आहे. त्यांना १५०० रुपये मिळणार की ३००० यासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना दिवाळीआधीच हप्ता मिळणार, खात्यात १५०० येणार की ३००० रुपये; महत्त्वाची अपडेट आली समोर
Ladki Bahin Yojana Updatesaam tv
Published On: 
  • लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींसाठी आनंदाची बातमी

  • दिवाळीपूर्वी लाडकींच्या खात्यावर जमा होणार पैसे

  • लाडकींना रुपये १५०० की ३००० मिळणार यासंदर्भात महत्वाची अपडेट आली समोर

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार यांची वाट पाहत आहेत. त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. पण लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळणार की ३००० रुपये मिळणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींना फक्त सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये म्हणजे एकच हप्त्याचे पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. महिला व बाल विकास विभागाला निधी मंजूर करण्यास सरकारने बुधवारी परवानगी दिली. लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये देण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी या योजनेकडे वळवला. अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र महिलांना पैसे देण्यासाठी ३४४.६२ कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना दिवाळीआधीच हप्ता मिळणार, खात्यात १५०० येणार की ३००० रुपये; महत्त्वाची अपडेट आली समोर
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ८१ लाख महिलांना पुन्हा ₹१५०० मिळणार?

३४४.६२ कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झाल्यानंतर आता दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये जमा होणार आहेत. या पैशातून लाडक्या बहिणींना दिवाळी साजरी करता येईल आणि त्यांना घर खर्चामध्ये हातभार लागेल. सरकार नेहमी सणासुदीचे औचित्य साधत लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देत आले आहे. त्यामुळे यावेळी देखील सरकार दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना खूश करणार आहे. सप्टेंबरच्या हप्त्याचे पैसे कधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार याबाबत अद्याप अधिकृत तारीख सांगण्यात आली नाही पण सरकार लवकरच याची घोषणा करेल.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना दिवाळीआधीच हप्ता मिळणार, खात्यात १५०० येणार की ३००० रुपये; महत्त्वाची अपडेट आली समोर
Ladki Bahin Yojana : १५०० रुपयात महिलांना विकत घेतलं जातंय, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com