संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दसऱ्यानंतर सोने- चांदीच्या दरात घट झालेली आहे. आज शुक्रवारी देखील सोन्या- चांदीचे भाव घसरले आहेत. विशेषतः चांदीत मोठी घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीचे वेध लागले असताना सोने- चांदी दोन्हींचे दर अचानक आवाक्यात आल्याने लग्नसराई तसेच सणासुदीला खरेदीसाठी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, वाढत्या महागाईची चिंता आणि गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांबाबत बदलत असलेल्या भूमिकेचा परिणाम सोने-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सलग घसरण झाली असून, ग्राहकांसाठी खरेदीची संधी निर्माण झाली आहे. मात्र, दर कमी होऊनही बाजारात अपेक्षित मागणी अद्याप दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी सोन्याच्या दरात ८२४ रुपयांची घट झाल्यामुळे तीन टक्के जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४८ हजार ११४ रुपयांवर आला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडताच सोन्याच्या दरात आणखी ११२३ रुपयांची घट झाली. परिणामी, तीन टक्के जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४६ हजार ९९१ रुपयांपर्यंत खाली आला. सोन्याच्या दरातील या घसरणीमुळे दागिने खरेदी करण्याचो विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, डॉलरची स्थिती, महागाईविषयक आकडेवारी आणि व्याजदरांबाबतच्या अपेक्षांमुळे सोन्याच्या दरात पुढेही बदल होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.