Gold Rate Today : सोने चांदीच्या दरात मोठे बदल! १ तोळा सोने १९०० रुपयांनी घसरले; वाचा 18K,22K, 24k चे ताजे दर

Gold Rate Today News : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे दर, तसेच चांदीचा किलोचा भाव जाणून घ्या.
Gold Rate Today News
Gold Rate Today NewsAI Image
Published On: 

दिवाळीचा सण जवळ आल्याने बाजारात सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्याचे अनेकांचे नियोजन असते. अशा ग्राहकांसाठी सराफा बाजारातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्यासह चांदीच्या किमतीतही घसरण झाल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करताना ग्राहकांचे लक्ष दरांकडे लागले आहे. आता दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात घट झाल्याने दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना ही चांगली संधी वाटू शकते. सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाख ४२ हजार ४८० रुपये इतकी आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. एक किलो चांदीच्या किमतीत ५ हजार रुपयांची घट झाली असून, सध्या तिचा दर २ लाख २० हजार रुपये इतका आहे. दरातील या बदलामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील ताजे दर तपासणे महत्त्वाचे आहे. कारण दागिन्यांच्या अंतिम किमतीत जीएसटी आणि घडणावळ शुल्काचाही समावेश होतो. त्यामुळे खरेदी करताना संपूर्ण खर्चाची माहिती घेऊनच निर्णय घ्यावा.

Gold Rate Today News
Sleep Health : अंतर्वस्त्रे न घालता रात्री झोपणं खरंच फायदेशीर आहे का?

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,२४८

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१३,९८४

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४२,४८०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,२४,८००

Gold Rate Today News
Potato Peels : बटाटा सोलून साली फेकून देता? 'असा' करा वापर, ८ दिवसांत दिसेल चमत्कार

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,०६०

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०४,४८०

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३०,६००

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,०६,०००

Gold Rate Today News
Earthquake : मध्यरात्री ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप,४ तासांत १३ वेळा धक्के; १६ जणांचा मृत्यूने हाहाकार

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,६८६

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८५,४८८

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०६,८६०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,६८,६००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com