Gold Price: सोन्याच्या दरात वाढ झाली की घट, २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती? वाचा सविस्तर

Gold Rate Today: सोनं खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे. सोन्याचे दर आज स्थिर आहेत. सोन्यासोबत चांदीचे दर देखील आज स्थिर आहेत. आज सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार वाचा सविस्तर...
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam tv
Published On

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झाली नाही. सोन्याचे दर आज स्थिर आहेत. त्यामुळे आज सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण बुधवारीच सोन्याचे दर प्रति ग्रॅम २१० रुपयांनी आणि प्रति दोळा २१०० रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यामुळे आज त्यांना कालच्याच किंमतीत सोनं खरेदी करता येणार आहे.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचे दर ९,८९५ रुपये प्रति ग्रॅम आहे. तर २४ कॅरेटचे १ तोळा सोन्याचे दर ९८,९५० रुपये इतके आहे. आज २२ कॅरेट सोन्याचे दर ९,०७० रुपये प्रति ग्रॅम आहे. तर १ तोळा सोन्याचे दर ९०,७०० रुपये इतके आहे. तसंच, आज १८ कॅरेट सोन्याचे दर ७,४२ रुपये प्रति ग्रॅम आहे. तर १ तोळ्यासाठी तुम्हाला आज ७४,२१० रुपये मोजावे लागणार आहेत.

Gold Rate Today
Today Gold Rate: खुशखबर! १० तोळं सोनं ५००० रुपयांनी झालं स्वस्त, एक तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

लग्नसराई त्याचसोबत इतर कार्यक्रमांसाठी सोनं खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल जास्त असतो. सोन्याचे दर प्रत्येक शहरानुसार वेगळे असतात. अनेकदा असे होते की मुंबईत सोन्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत कमी असतात. महत्वाचे म्हणजे आज चांदीच्या दरात देखील काहीच बदल झाली नाही. दर बुधवारी जेवढे होते तेवढेच आहेत. त्यामुळे चांदी देखील खरेदी करण्यासाठी आज चांगली संधी आहे.

Gold Rate Today
Gold Rates:ग्राहकांसाठी खुशखबर, सोनं पुन्हा स्वस्त झालं, आजचा २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर किती?

आज भारतात चांदीची किंमत प्रति ग्रॅम १०८ रुपये आणि प्रति किलो ग्रॅम १,०८,००० रुपये इतकी आहे. भारतातील चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय किमतींनुसार निश्चित केली जाते. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या चलनाच्या हालचालीवर देखील चांदीच्या किंमती अवलंबून असतात. जर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आणि आंतरराष्ट्रीय किमती स्थिर राहिल्या तर भारतात चांदी अधिक महाग होईल.

Gold Rate Today
Mumbai Gold Scam : मुंबईतील सराफ पेढीला तब्बल 13,00,00,000 रुपयांना गंडा; सेल्समनच निघाला चोर, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com