Gold Price: सोन्याचे दर वाढले की कमी झाले? जाणून घ्या २२ अन् २४ कॅरेटचे आजचे भाव?

Gold price today in India: १९ जून रोजी सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार झाले. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला, तर चांदीही महागली. लग्नसराईत ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसतोय.
Gold Price Today
Gold Price TodaySaam Tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याच्या दराला चकाकी आली आहे. सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असून, ऐन लग्नसराईच्यावेळी ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. अशातच आज १९ जून २०२५ रोजी , भारतीय बाजारात सोन्याच्या दरामध्ये किंचित बदल दिसून येत आहे. तसेच चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आजचा दर किती? पाहुयात.

गुरूवारी स्थानिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत किंचित चढ उतार पाहायला मिळालं. २४ कॅरेट सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर १,०१,०८० रूपये इतका आहे. जी कालच्या तुलनेत १७० रूपयांनी वाढली आहे. दरम्यान, १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आता १०,१०,८०० रूपये झाली आहे. कालच्या तुलनेत आजच्या सोन्याच्या दरात १७०० रूपयांनी वाढ झाली आहे.

तसेच २२ कॅरेट सोन्याच्या किमतीतही थोडी वाढ झाली आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९२,६५० रूपये झाली आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात १५० रूपयांनी वाढ झाली आहे. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा दर ९,२६,५०० इतका आहे. कालच्या तुलनेत आजच्या १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १,५०० रूपयांनी वाढ झाली आहे. प्रमुख शहरांमध्येही सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे.

Gold Price Today
Spa Centre: मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांकडून भंडाफोड; १० महिला अन् ३ पुरूष ताब्यात

१८ कॅरेट सोन्याच्या दरातही थोडीशी वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या ८ ग्रॅमची किंमत आता ६०,६४८ रूपये इतका आहे. कालच्या तुलनेत आजच्या दरात १२० रूपयांची वाढ झाली आहे. १०० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याचा दर ७,५८,१०० रूपये इतका आहे कालच्या तुलनेत आजच्या दरात १२०० रूपयांनी वाढ झाली आहे.

चांदीच्या किमतीतही चढ उतार

गुरूवारी चांदीच्या किमतीतही वाढ झाली. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे एक किलो चांदीसाठी १,११,१०० मोजावे लागतील. तर, चेन्नईमध्ये चांदीचा भाव १,२१,१०० रूपयांवर पोहोचला आहे.

Gold Price Today
Beed News: शेतीवरून वाद अन् बेल्टनं झोडलं, महिलेला जमिनीवर ढकलून ट्रॅक्टर अंगावर घातला; नेमकं काय घडलं?

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक?

सोने खरेदी करताना सराफ आपल्याला २४ कॅरेट पाहिजे की २२ कॅरेट? असा प्रश्न विचारतात. २४ कॅरेट सोन शुद्ध मानले जाते. त्यात कोणतीही भेसळ नसते. २४ कॅरेट सोनं ९९.९% शुद्ध आणि २२ कॅरेट सोनं ९१% शुद्ध असते. २२ कॅरेट सोन्यामध्ये इतर धातू मिक्स केले जातात. सराफ तांबे, चांदी जस्त यांसारखे धातू मिसळून दागिन बनवतात. २४ कॅरेट सोनं शुद्ध असले तरी, त्याचे दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश सराफ २२ कॅरेट सोनं विकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com