Beed News: शेतीवरून वाद अन् बेल्टनं झोडलं, महिलेला जमिनीवर ढकलून ट्रॅक्टर अंगावर घातला; नेमकं काय घडलं?

Latest Beed Crime News: बीडच्या शिरूर कासार येथे शेतजमिनीच्या वादातून महिलेला ट्रॅक्टरने उडवण्याचा प्रयत्न. बेल्टने मारहाण. आरोपींविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरू.
Beed Crime
Woman assaulted in Beed over farmland disputeSaam TV News
Published On

जुन्या शेतजमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान वाद उफाळून आला. या वादादरम्यान आरोपींनी महिलेला बेल्टनं मारहाण केली, तसेच तिच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे घडली असून, महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन तांबा येथील रहिवासी आहे. पती हयात नसल्यामुळे महिला आपल्या चुलत सासऱ्यांसोबत राहते. १० जूनला दुपारच्या सुमारास पीडित महिला आणि तिचे सासरे शेतावर गेले होते. त्याठिकाणी आरोपी दिपक दत्तात्रय खोले, नानासाहेब लक्ष्मण तांबे, रामेश्वर भानुदास औसरमल ट्रॅक्टर घेऊन तेथे पोहोचले.

Beed Crime
Politics: मोठा राजकीय भूकंप! काँग्रेसमधील बडा नेता अजित पवार गटाच्या गळाला लागला; ११ हजार कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश

यानंतर शेतात वाद सुरू झाला. 'शेत तुझ्या बापाचे आहे का?' असं म्हणत दिपक दत्तात्रय खोले याने महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यास सुरूवात केली. तसेच शिवीगाळ देण्यास सुरूवात केली. महिलेनं स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, नानासाहेब लक्ष्मण खोले यानं महिलेला जमिनीवर ढकललं आणि बेल्ट तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली, असा आरोप महिलेनं केला.

Beed Crime
Ulhasnagar: मावळनंतर उल्हासनगरचा पूल कोसळला; ५०० जणांचा संपर्क तुटला, पूल खचला पण..

त्यानंतर रामेश्वर भानुदास औसरमल या आरोपीने ट्रॅक्टर घेऊन महिलेच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. महिलेनं आरोपींच्या तावडीतून कसाबसा सुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच तिन्ही आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जखमी महिलेवर सध्या बीड जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com