Gold Price Drop
Gold Price DropSaam TVNews

Gold Rates:ग्राहकांसाठी खुशखबर, सोनं पुन्हा स्वस्त झालं, आजचा २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर किती?

Today's Gold Price: इराण-इस्त्रायल युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर भारतात सोन्याचे दर घसरले असून १० ग्रॅमला ₹१०० ची घसरण झाली आहे. चांदीचा दर ₹१,०९,९०० प्रति किलो स्थिर आहे.
Published on

सोन्याने अलीकडे उच्चांकी दर गाठल्यानंतर आता त्याच्या किंमतीत घसरण होऊ लागली आहे. इराण इस्त्रायल युद्धबंदीच्या वृत्तांमुळे सोन्याच्या किमती घसरण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवार, २४ जून रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोनं १०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सध्या देशातील प्रमुख शहरांतील सराफा बाजारात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹१,००,६०० इतकी आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹९२,००० इतकी आहे. तर, चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सोन्याच्या किमतीत कालच्या तुलनेत आज घसरण पाहायला मिळत आहे. दिल्लीत २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९२,४४० रूपये इतकी आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर १,००,८३० इतका आहे. मुंबईतही २२ कॅरेट सोन्याचा दर ९२,२९० रूपये तर, २४ कॅरेट सोन्याची किंमत १,००,६८० रूपये इतकी आहे. पटना, लखनऊ, जयपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये सोन्याची किंमत याच दराभोवती आहे.

Gold Price Drop
Shocking: देखण्या सुनेवर सासऱ्याचा डोळा, चॅटिंग करत प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं; शेवटी पळून जाऊन लग्न उरकलं

चांदीची किंमत

आज चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ किलो चांदीची किंमत १,०९,९०० रूपये इतकी आहे. अनेक तज्ज्ञांचा असा दावा आहे की, दिवाळीपर्यंत चांदीची किंमत १,२०,००० रूपयांपर्यंत पोहोचू शकते. अशा परिस्थितीत, चांदीमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Gold Price Drop
Belgaum: मठात मध्यरात्री जोरदार राडा; स्वामींच्या खोलीत रात्री महिलेला बघितल्यानं गावकऱ्यांनी घातला गोंधळ

देशात सोन्याचे दर कसे ठरवले जातात?

भारतात सोन्याच्या किंमती या अनेक घटकांवर अवलंबून असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, रुपया आणि डॉलर यातील दर, तसेच सरकारकडून आकारण्यात येणारे विविध कर यांचा समावेश होतो. भारतामध्ये सोनं ही केवळ गुंतवणूक नसून एक पारंपरिक आणि सांस्कृतिक बाबही आहे. लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि विशेषतः दिवाळीच्या काळात सोन्याच्या खरेदीस मोठी मागणी असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com