

तुम्ही ITR फाईल करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना घाईगडबडीत बऱ्याचदा चुकीचा फॉर्म निवडला जातो. यामध्ये ३१ जुलैच्या शेवटच्या मुदतीच्या आसपास ITR-१ किंवा ITR-२ दाखल केल्यानंतर काही करदात्यांना इंट्राडे ट्रेडिंग, F&O मधले व्यवहार किंवा फ्रीलान्सिंगमधून मिळालेलं उत्पन्न लक्षात येतं. अशा परिस्थितीत ITR- ३ किंवा ITR- ४ सारखा वेगळा फॉर्म लागू होऊ शकतो. मात्र, चुकीचा फॉर्म भरल्यावर घाबरण्याची गरज नाही.
तुम्ही ITR दाखल केला आहे, पण अजून त्याचे ई-वेरिफिकेशन केलेले नसेल, तर इन्कम टॅक्स ई- फायलिंग पोर्टलवर Discard पर्यायाचा वापर करता येतो. यामुळे अनवेरिफाइड रिटर्न हटवता येतो. त्यानंतर योग्य ITR फॉर्म निवडून नवीन रिटर्न दाखल करता येतो.
तुम्ही ITR दाखल केला आहे, पण अजून त्याचे ई-वेरिफिकेशन केलेले नसेल, तर इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर ‘Discard’ पर्यायाचा वापर करता येतो. यामुळे अनवेरिफाइड रिटर्न हटवता येतो. त्यानंतर योग्य ITR फॉर्म निवडून नवीन रिटर्न दाखल करता येतो.
एकदा रिटर्न ई-वेरिफाय झाल्यानंतर त्याच असेसमेंट इयरसाठी पुन्हा ओरिजिनल रिटर्न दाखल करता येत नाही. अशावेळी आयकर कायद्याच्या कलम 139(5) अंतर्गत Revised Return दाखल करून चूक दुरुस्त करता येते.
F&O किंवा इंट्राडे ट्रेडिंगमधील पात्र नुकसान पुढील वर्षांतील उत्पन्नाशी सेट-ऑफ करण्यासाठी कॅरी फॉरवर्ड करायचे असल्यास संबंधित मुदतीत योग्य रिटर्न दाखल करणे महत्त्वाचे ठरू शकते. तसेच, व्यवसायातून उत्पन्न असलेल्या करदात्यांना जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडण्यासाठी लागू असलेल्या नियमांनुसार Form १०-IEA दाखल करावा लागू शकतो. चूक लवकर दुरुस्त केल्यास विलंबामुळे होणारे अतिरिक्त शुल्क, लेट फी किंवा इतर करविषयक गुंतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते.
होय. सामान्यतः कलम 139(5) अंतर्गत संबंधित असेसमेंट इयरच्या ३१ मार्चपर्यंत, असेसमेंट पूर्ण होण्यापूर्वी, Revised Return दाखल करता येतो. मात्र, जास्त उशीर केल्याने रिफंडला उशीर होऊ शकतो किंवा रिटर्नमध्ये त्रुटी असल्यास कलम 139(9) अंतर्गत Defective Return ची नोटीस येऊ शकते.
त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या ITRचा स्टेटस तपासा. अनवेरिफाइड रिटर्न असल्यास योग्य फॉर्मसह नवीन रिटर्न दाखल करण्याचा पर्याय पाहा; वेरिफाइड रिटर्नमध्ये चूक असल्यास Revised Return दाखल करा. फॉर्मबाबत संभ्रम असल्यास कर सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.