Family Pension Rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दरमहा ₹9,000 मिळणार? सरकारने स्पष्ट केले पेन्शनचे नियम

Central Government Pension : केंद्र सरकारने कुटुंब निवृत्तीवेतनाचे नियम स्पष्ट केले आहेत. ९००० रुपये उत्पन्नाची मर्यादा, पती-पत्नीची पात्रता, आणि आश्रित आई-वडिलांसाठी महत्त्वाचे निकष जाणून घ्या.
Family Pension Rules
Family Pension Rules saam tv
Published On: 

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातल्या कोणत्या सदस्यांना कुटुंब निवृत्तीवेतन (Family Pension) मिळू शकते, याबाबत केंद्र सरकारने नियम स्पष्ट केले आहेत.

तसेच या पेन्शनसाठी पात्र ठरणाऱ्या काही सदस्यांच्या उत्पन्नाच्या मर्यादाही ठरवण्यात आली. केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, २०२१ मधला नियम ५०(११) नुसार हे निकष लागू आहेत.

Family Pension Rules
Motor Insurance Rules : १५ डिसेंबरपासून वाहनधारकांना मोठा झटका! कार-बाईक विम्याचे नियम बदलणार

कुटुंब निवृत्तीवेतनासाठी उत्पन्न किती असावं?

नियमानुसार, पात्र कुटुंब सदस्याचे स्वतःचे मासिक उत्पन्न ९००० रुपये आणि त्यावरच्या लागू महागाई सवलत (DR) यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. या उत्पन्नाची गणना करताना मिळणाऱ्या कुटुंब निवृत्तीवेतनाची रक्कम मोजली जाणार नाही. मात्र, ही उत्पन्न मर्यादा पती किंवा पत्नी तसेच दिव्यांग मुलांना आणि भावंडांना लागू होणाऱ्या विशेष नियमांपेक्षा वेगळी आहे.

Family Pension Rules
Maratha Startup Scheme: उद्योजक व्हायचंय? मराठा-कुणबी तरुणांना सरकार दरमहा देणार 25 हजार रुपये! कोणती कागदपत्रे लागणार?

दिव्यांग मुलांसाठी वेगळे निकष

मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या मुलांना आणि भावंडांना कुटुंब निवृत्तीवेतन देण्यासाठी स्वतंत्र उत्पन्न निकष आहेत. त्यांचे कुटुंब निवृत्तीवेतन वगळून इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न हे त्यांना मिळण्यास पात्र असलेल्या निवृत्तीवेतनाच्या रकमेपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. सध्या संबंधित नियमानुसार ही रक्कम सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या ३० टक्के आणि त्यावर लागू महागाई सवलतीवरून ठरते.

पती किंवा पत्नीला उत्पन्नाची अट नाही

कायदेशीर पती किंवा पत्नीला कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा लागू नाही. म्हणजेच, ते नोकरी करत असले किंवा त्यांचे उत्पन्न जास्त असले, म्हणून फक्त या कारणामुळे त्यांचे कुटुंब निवृत्तीवेतन बंद केलं जाणार नाही. मात्र, पुनर्विवाह केलेल्या अपत्यहीन विधवेला ही सवलत लागू होत नाही. तिला इतर पात्र सदस्यांप्रमाणे उत्पन्नाची अट पूर्ण करावी लागते.

या सदस्यांना आर्थिक अवलंबित्व सिद्ध करावे लागणार

अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित मुली, आश्रित आई-वडील तसेच दिव्यांग भाऊ-बहिणींना कुटुंब निवृत्तीवेतनासाठी आर्थिकदृष्ट्या मृत कर्मचारी किंवा पेन्शनधारकावर अवलंबून असल्याचं सिद्ध करावं लागू शकते. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कुटुंबीयांनी कुटुंब निवृत्तीवेतनाचे हे नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे. अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाकडून पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.