Maratha Startup Scheme: उद्योजक व्हायचंय? मराठा-कुणबी तरुणांना सरकार दरमहा देणार 25 हजार रुपये! कोणती कागदपत्रे लागणार?

Maratha Kunbi Yojana : मराठी-कुणबी तरुणांसाठी सारखीची मोठी संधी! स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी एक वर्षाचं मोफत प्रशिक्षण आणि दरमहा ठरावित रक्कम मिळणार आहे.
Maratha Startup Scheme
Maratha Startup Schemesaam tv
Published On: 

सध्या पैसा कमवणं ही काळाची गरज आहे. कारण आता फक्त शेती करून आर्थिक समस्या, गरजा सोडवता येत नाहीत. त्यात महागाई सुद्धा वाढत चालली आहे. आता काही तरुण या दिवसात स्वत:चा व्यवयास करण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.

आता मराठा-कुणबी तरुणांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथीच्या माध्यमातून तरुणांना स्टार्टअप उभारण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जाणार असून, प्रशिक्षणाच्या काळात दरमहिन्याला २५ हजार रुपयांचे विद्यावेतनही मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे व्यवसाय सुरू करू न शकणाऱ्या तरुणांना मोठा आधार मिळू शकतो.

Maratha Startup Scheme
Ujjwala Yojana: 1,267 रुपयांचा गॅस सिलिंडर मिळतोय फक्त 642 रुपयांत! या महिलांना मिळतोय मोठा फायदा

प्रशिक्षणात काय शिकायला मिळणार?

तर या उपक्रमाचा मुख्य उद्देश मराठा, कुणबी आणि मराठी-कुणबी समाजातल्या पदवीधर तरुणांच्या व्यावसायिक कल्पनांना प्रत्यक्ष स्टार्टअपचं स्वरूप देणं असा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्ष व्यवसाय उभारणीचे प्रशिक्षण दिले. यामध्ये व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठेत विश्लेषण, उद्योगाची व्यवहार्यता आणि स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी शिकवल्या जाणार आहेत. तसेच उद्योग क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शनही मिळेल. म्हणजेच प्रशिक्षणाच्या संपूर्ण कालावधीत पात्र उमेदवारांना दर महिन्याला २५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.

Maratha Startup Scheme
Digital Payments : छोट्या दुकानदारांसाठी NPCI ची मोठी भेट! UPI सुरू केल्यास मिळणार ₹750 पर्यंतचा फायदा; QR कोडही बसवता येणार मोफत

कोणाला करता येणार अर्ज?

तसेच या उपक्रमासाठी मराठा, कुणबी आणि मराठा-कुणबी प्रवर्गातल्या पदवीधर युवक अर्ज करू शकतात. अर्जदाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. पदवी झालेले तरूण अर्ज करू शकतात. अर्जदाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. तसेच स्वत:चा नाविन्यपूर्ण आणि व्यवहार्य स्टार्टअप सुरू करण्याची कल्पना असणं गरजेचं आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

1. शैक्षणिक पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका

2. मराठा, कुणबी किंवा मराठा-कुणबी प्रवर्गाचा दाखला

3. आधार कार्ड

4. पासपोर्ट आकाराचा फोटो

5. स्टार्टअप संकल्पनेचा संक्षिप्त आराखडा

6. व्यवसाय कल्पनेशी संबंधित आवश्यक माहिती

अर्ज कसा करायचा? शेवटची मुदत काय?

इच्छुक उमेदवारांना सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल. प्राप्त अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर गुणांकन आणि मुलाखतीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. दिलेल्या माहितीनुसार, अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२६ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.