Ujjwala Yojana: 1,267 रुपयांचा गॅस सिलिंडर मिळतोय फक्त 642 रुपयांत! या महिलांना मिळतोय मोठा फायदा

LPG Cylinder Subsidy : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पात्र महिलांना गॅस सिलिंडरवर ६२५.२४ रुपयांची मदत मिळत असल्याची माहिती आहे.
Big Relief for Ujjwala Yojana Women
Big Relief for Ujjwala Yojana Womenlatest news
Published On: 

घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा दिला जातो. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एलपीजी सिलिंडरवर दोन प्रकारे आर्थिक मदत मिळते. त्यामुळे १,२६७ रुपये किमतीचा १४.२ किलोचा गॅस सिलिंडर लाभार्थ्यांना प्रभावीपणे ६४२ रुपयांत पडेल.

गॅस सिलिंडरवर मिळतेय ६२५ रुपयांची मदत

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर एकूण ६२५.२४ रुपयांची मदत दिली जात आहे. यामध्ये दोन प्रकारच्या मदतीचा समावेश आहे.

३०० रुपयांची सबसिडी - पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

३२५.२४ रुपयांची अतिरिक्त मदत - ही रक्कम सरकारकडून प्रति सिलिंडरच्या खर्चासाठी दिली जाते.

या दोन्ही मदतीमुळे लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर कमी किमतीत मिळायला मदत होते. मात्र, प्रत्यक्ष भरावी लागणारी रक्कम स्थानिक गॅस दर आणि लागू असलेल्या अनुदानाच्या अटींनुसार बदलू शकते.

Big Relief for Ujjwala Yojana Women
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार? ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

काय आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना?

केंद्र सरकारने मे २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरूवात केली. गरीब कुटुंबातल्या प्रौढ महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पुर्वी अनेक कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा आणि शेणाचा वापर केला जात होता. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. हा त्रास कमी करून स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

Big Relief for Ujjwala Yojana Women
Digital Payments : छोट्या दुकानदारांसाठी NPCI ची मोठी भेट! UPI सुरू केल्यास मिळणार ₹750 पर्यंतचा फायदा; QR कोडही बसवता येणार मोफत

सबसिडी कोणाला मिळते?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेतलेल्या पात्र लाभार्थ्यांना सरकारकडून अनुदान दिलं जातं. ऑक्टोबर २०२३ मध्ये केंद्र सरकारने उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी प्रति १४.२ किलो सिलिंडर ३०० रुपयांची लक्षित सबसिडी मंजूर केली होती. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.