Indian Oil Jobs: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार इंडियन ऑइलमध्ये नोकरी; २७००हून अधिक पदांसाठी भरती

Indian Oil Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. २७०० पेक्षा जास्त अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
IOCL Recruitment
IOCL RecruitmentSaam Tv
Published On
Summary

इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी

अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरु

अर्ज कुठे अन् कसा करावे?

फ्रेशर्स आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तुम्ही १२वी पास आणि आयटीआय, डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर ही उत्तम संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिप पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

इंडियन ऑइलमध्ये २७०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. चांगल्या कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २८ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे.

IOCL Recruitment
Governemnt Job: बेरोजगारांना मोठा दिलासा! १० हजार ३०९ जणांना शासकीय नोकरी | VIDEO

इंडियन ऑइलमधील ही भरती ९ रिफाइनरी युनिटमध्ये होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. तुमची निवड थेट मेरिट बेसिसवर होणार आहे.

इंडियन ऑइलमध्ये २७५६ पदांसाठी भरती केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२५ आहे.१८ ते २४ वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचे आहेत. तुम्हाला iocl.com वर जाऊन अर्ज करायचा आहे.

पात्रता

अप्रेंटिस पदासाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी (मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंडस्ट्रीयल केमिस्ट्री) मध्ये ३ वर्षांचा बी.एससी केलेली असावी. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी ३ वर्षांचा डिप्लोमा केलेला असावे. ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे.

IOCL Recruitment
UCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; UCIL मध्ये भरती सुरु, पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

अर्ज कसा करावा? (Application Process)

सर्वात आधी तुम्हाला iocl.com वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर करिअर सेक्शनवरी अप्रेंटिसशिपवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला Click Here to Register/Apply on NATS/NAPS Portal NATS, NAPS वर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज करायचे आहे तिथे फॉर्म भरायचा आहे.

तुमची सर्व माहिती भरा. शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा. यानंतर फोटो आणि सही अपलोड करावीत.

यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

IOCL Recruitment
Government Job: १०वी पास आहात? सुरक्षा मंत्रालयाच्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करायचा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com