IPL 2026: IPL मधील सर्वात मोठा ट्रेड, जडेजा राजस्थानच्या ताफ्यात तर संजू सॅमसन CSK संघात; मानधनात घट...

IPL 2026 Player Trade Updates: आयपीएल २०२६ सीझनपूर्वी मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक खेळांडूच्या टीममध्ये बदल झाला आहे. रवींद्र जडेजा आता चेन्नई सुपर किंग्सऐवजी राजस्थान रॉयल्सकडून खेळेल. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये गेला आहे.
IPL 2026: IPL मधील सर्वात मोठा ट्रेड, जडेजा राजस्थानच्या ताफ्यात तर संजू सॅमसन CSK संघात; मानधनात घट...
IPL 2026 Player Trade UpdatesSaam Tv
Published On

आयपीएल २०२६ च्या सीझनपूर्वी दहाही टीमध्ये खेळांडूची आदला बदल सुरू आहे. अर्जुन तेंडुलकर आणि मोहम्मद शमी हे लखनऊ सुपर जायंट्समध्ये सहभागी झालेत. रवींद्र जडेजा आता चेन्नई सुपर किंग्सऐवजी राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये गेला. महत्वाचे म्हणजे राजस्थान रॉयल्समध्ये गेल्यापासून रवींद्र जडेजाच्या पगारात घट होत चालली आहे.

चेन्नई सुपर किंग्समध्ये असताना रवींद्र जडेजाचा मानधन १८ कोटी रुपये इतका होता. आता त्याला राजस्थान रॉयल्समधून १४ कोटी रुपये मिळणार आहे. म्हणजे तब्बल ४ कोटी रुपये मानधन कमी झाला. आयपीएल २०२६ मध्ये कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये दिसणार आणि त्यांचा मानधन किती हे आपण जाणून घेणार आहोत...

रवींद्र जडेजा -

सीनिअर ऑलराऊंडर आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कॅप्टन रवीद्र जडेजा आयपीएल -२०२६ मध्ये राजस्थान रॉयल्स या टीमकडून खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी तो १२ आयपीएल खेळला आहे. रवींद्र जडेजा हा आयपीएलचा अनुभवी खेळाडू आहे. रवींद्र जडेजाने २५४ आयपीएल सामन्यांमध्ये १७० विकेट्स घेतल्या आहेत आणि ३२६० धावा केल्या आहेत. आयपीएल २०२६ च्या सीझनसाठी राजस्थान रॉयल्स रवींद्र जडेजाला १४ कोटी रुपये मानधन देणार आहे.

संजू सॅमसन -

राजस्थान रॉयल्सचा माजी कॅप्टन आणि भारतीय विकेटकीपर संजू सॅमसन आता चेन्नई सुपर किंग्समधून खेळणार आहे. त्याला १८ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी तो एक आहे. संजू सॅमसनने १७७ आयपीएल सामने खेळले आहेत आणि ४,७०४ धावा केल्या आहेत.

IPL 2026: IPL मधील सर्वात मोठा ट्रेड, जडेजा राजस्थानच्या ताफ्यात तर संजू सॅमसन CSK संघात; मानधनात घट...
IND vs SA VIDEO: लेगमध्ये त्याचा कॅच मिळतो...! टेम्बा बवुमासाठी पंतने आपल्या स्टाईलने लावली फिल्डींग; पुढच्याच बॉलला गेली विकेट

सॅम करन -

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन चेन्नई सुपर किंग्समधून खेळणार असून त्याला २.४ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. सॅम करनने ६४ आयपीएल सामन्यांमध्ये ५९ विकेट्स घेतल्या आहेत आणि ९९७ धावा केल्या आहेत.

मोहम्मद शमी -

अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. आयपीएल २०२६ च्या सीझनपूर्वी मोहम्मद शमी त्याच्या सध्याच्या १० कोटी रुपयांच्या मानधनावर लखनऊ सुपर जायंट्समध्ये सहभागी झाला आहे.

IPL 2026: IPL मधील सर्वात मोठा ट्रेड, जडेजा राजस्थानच्या ताफ्यात तर संजू सॅमसन CSK संघात; मानधनात घट...
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला फिरकीच्या जाळ्यात गुंडाळणार; टीम इंडिया मैदानावर उतरवणार ४ हुकुमी एक्के

मयंक मार्कंडेय -

कोलकाता नाईट रायडर्सकडून यशस्वी व्यवहारानंतर लेग-स्पिनर मयंक मार्कंडेय मुंबई इंडियन्समध्ये परतणार आहे. केकेआरने मार्कंडेला ३० लाखांमध्ये विकत घेतले. मयंक त्याच्या आधीच्या मानधनावरच मुंबई इंडियन्समध्ये परतणार आहे. मयंकने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्सकडून केली होती. तो २०१८, २०१९ आणि २०२२ मध्ये फ्रँचायझीकडून खेळला.

अर्जुन तेंडुलकर -

बॉलिंग ऑलराऊंडर अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स या टीममध्ये होता. आता तो लखनऊ सुपर जायंट्समधून खेळणार आहे. अर्जुन त्याच्या सध्याच्या ३० लाख रुपयांच्या मानधनावरच लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे.

IPL 2026: IPL मधील सर्वात मोठा ट्रेड, जडेजा राजस्थानच्या ताफ्यात तर संजू सॅमसन CSK संघात; मानधनात घट...
IND vs SA: भारतीय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना; कर्णधार शुभमनच्या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित

नितीश राणा -

नितीश राणा आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळेल. तो त्याच्या सध्याच्या ४.२ कोटी रुपयांच्या मानधनावरच या टीममधून खेळणार आहे. जो TATA IPL २०२५ सीझनपूर्वी आरआरने त्याच्यासाठी बोली लावली होती.

डोनोव्हन फरेरा -

दिल्ली कॅपिटल्सकडून यशस्वी व्यवहारानंतर ऑलराऊंडर डोनोवन फरेरा त्याच्या माजी फ्रँचायझी, राजस्थान रॉयल्समध्ये परतणार आहे. हस्तांतरण करारानुसार त्याचे शुल्क ७५ लाखांवरून १ कोटी करण्यात आले आहे.

IPL 2026: IPL मधील सर्वात मोठा ट्रेड, जडेजा राजस्थानच्या ताफ्यात तर संजू सॅमसन CSK संघात; मानधनात घट...
Ind Vs Sa: बुमराहचा 'पंच'! टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिका 159 रन्सवर ऑलआऊट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com