Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Ind vs Eng test match draw : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ झालाय. जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला गेला आहे.
eng vs ind
eng vs india test match Saam tv
Published On
Summary

भारत आणि इंग्लंडमधील चौथी कसोटी सामना मँचेस्टरमध्ये ड्रॉ झालाय.

रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या संयमी खेळीने टीम इंडियाचा पराभव टळला.

इंग्लंडचा मालिका विजयाचा प्रयत्न फसला आहे.

भारत आणि इंग्लंडदरम्यान मँचेस्टरमध्ये खेळवण्यात आलेला चौथा कसोटी सामना रविवारी ड्रॉ झाला. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या खेळीमुळे भारताचे मनसुबे फत्ते झाले. भारताच्या चांगल्या फलंदाजीमुळे इंग्लंड संघाचं मालिका विजयाचं स्वप्न भंगलं. तर भारताच्या फलंदाजीमुळे संघाचा मानसिक विजय झाल्याची भावना चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.

इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावा करून ३११ धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडच्या फलंदाजीनंतर मैदानात उतरलेल्या भारताने फलंदाजीतून जोरदार प्रत्युत्तर दिलं. केएल राहुल-शुभमन गिल आणि रविंद्र जडेजा-वॉशिंग्टन सुंदरच्या शतकी भागीदारी खेळली. त्यामळे दुसऱ्या डावात आघाडी मिळवली. यामुळे इंग्लंडचं मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं. दुसऱ्या डावात भारताने ४ गडी गमावून ४२५ धावा कुटल्या. भारताकडून शुभमन गिल, रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने शतक ठोकलं.

eng vs ind
Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

भारतीय संघाची दुसऱ्या डावात सुरुवात खराब झाली. टीम इंडियाचे यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन हे पहिल्या षटकात बाद झाले. यानंतर शुभमन गिल आणि केएल राहुलने तिसऱ्या विकेटसाठी ४२१ चेंडूत १८८ धावांची भागीदारी रचली. मात्र, बेन स्टोक्सने दोघांची भागीदारी तोडली.

eng vs ind
Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताच्या केएल राहुलचा विकेट गेला. राहुलने २३० चेंडूत ९० धावा करून तंबूत परतला. कर्णधार शुभमन गिलने २३८ चेंडूत १०३ धावा करून बाद झाला. शुभमनला आर्चरने बाद केलं. तर वॉशिंग्टन सुंदर (१०१) आणि रविंद्र जडेजा (१०७) धावा कुटल्या. इंग्लंडने शनिवारी पहिल्या डावात ६६९ धावा कुटल्या होत्या. तर भारताने पहिल्या डावात ३५८ धावा कुटल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com