CNG Price : महिन्याच्या शेवटी सर्वसामान्यांना मोठा झटका! सीएनजीचे दर पुन्हा वाढले, पाहा सविस्तर

CNG Price Hike: IGL ने दिल्ली-NCR मध्ये सीएनजीच्या दरात ३.८९ रुपये प्रति किलोने वाढ केली आहे. दिल्लीतील सीएनजीचा नवीन दर ८६.९८ रुपये झाला असून इतर शहरांतील नवे दरही जाणून घ्या.
CNG Price Hike IGL Increases CNG Rates 4 rupee per Kg in Delhi-NCR Check New Prices
Pune CNG Price Saam TV
Published On

CNG price hike in Delhi NCR : दिल्ली आणि आसपासच्या परिसरात (दिल्ली-NCR) इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (IGL) सीएनजीच्या (CNG) दरात थेट ३.८९ रुपये प्रति किलो एवढी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलएनजीचे भाव वाढल्यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे. नव्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत आता सीएनजीचा दर ८६.९८ रुपये प्रति किलो झाला आहे. तर नोएडा आणि गाझियाबादमध्ये हा दर ९५.५९ रुपये, गुरुग्राममध्ये ९२.०१ रुपये आणि मेरठमध्ये ९५.४७ रुपये प्रति किलो झाला आहे. वेगवेगळ्या राज्यांनुसार कर (VAT) वेगवेगळा असल्यामुळे शहरांनुसार दरांमध्ये थोडा फरक दिसून येतो.

२०२६ वर्षात सीएनजीच्या भावात झालेली ही पाचवी वाढ आहे. मध्य पूर्वेतील युद्धाच्या तणावामुळे समुद्रातून होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात गॅसचे भाव वाढले आहेत आणि त्याचा थेट परिणाम आता दिल्ली-एनसीआरमधील ऑटो, टॅक्सी आणि माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर पडणार आहे. येत्या काळात सर्वसामान्यांचा प्रवास आणि वाहतूक खर्च आणखी महाग होण्याची शक्यता आहे.

CNG Price Hike IGL Increases CNG Rates 4 rupee per Kg in Delhi-NCR Check New Prices
पेट्रोल ₹१२५ रुपये लिटर झाले असते! सरकारच्या दाव्याने वाहनचालक चक्रावले; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

या वर्षातील सीएनजी दरातील ही पाचवी दरवाढ आहे. मे महिन्यानंतरची ही पहिलीच दरवाढ आहे. मे महिन्यात पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जेच्या जागतिक दरात झालेल्या वाढीमुळे आयजीएलने १० दिवसांच्या कालावधीत चार टप्प्यांत एकूण ६ रुपये प्रति किलोने दर वाढवले ​​होते. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.

CNG Price Hike IGL Increases CNG Rates 4 rupee per Kg in Delhi-NCR Check New Prices
Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज वाढ झाली की घसरण? वाचा तुमच्या शहरातील दर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील संकट पुन्हा वाढल्याने आणि त्याचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या मालवाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या वर्षी जुलैपासून जागतिक स्तरावर एलएनजीच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. आशिया-जेकेएम एलएनजी बेंचमार्क या वर्षी फेब्रुवारीमधील प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट्स (एमएमबीटीयू) ११ डॉलरवरून ऑगस्टमध्ये २३.४ डॉलरपर्यंत वाढला आहे, तर युरोपियन टीटीएफ गॅस बेंचमार्कदेखील ११.३ डॉलर प्रति एमएमबीटीयूवरून २३.३ डॉलर प्रति एमएमबीटीयूपर्यंत वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com