WhatsApp नंबर बदलताय? 'या' ५ चुका अजिबात करू नका; नाहीतर कायमचा गमावाल तुमचा महत्त्वाचा डेटा

WhatsApp Number : व्हॉट्सॲपचा नंबर बदलताना केलेल्या छोट्या चुका महागात पडू शकतात. जुने चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि ग्रुप्स सुरक्षित ठेवण्यासाठी या ५ महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
WhatsApp update
WhatsApp updategoogle
Published On: 

स्मार्टफोनमध्ये नवीन सिम कार्ड टाकल्यानंतर व्हॉट्सॲपचा नंबर बदलणे ही सामान्य गोष्ट वाटते. पण घाईगडबडीत केलेली एक छोटी चूक तुम्हाला महागात पडू शकते. अनेकदा नंबर बदलताना योग्य पद्धत न वापरल्यामुळे जुने मेसेजेस, महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ आणि ग्रुप्स कायमचे डिलीट होतात. त्यामुळे व्हॉट्सॲपचा नंबर बदलण्यापूर्वी कोणत्या ५ गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि डेटा कसा सुरक्षित ठेवावा, याविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

'Change Number' या अधिकृत फीचरचाच वापर करा

अनेक लोक नवीन नंबरवर व्हॉट्सॲप सुरू करण्यासाठी जुने ॲप अनइन्स्टॉल करतात किंवा अकाऊंट डिलीट करून थेट नवीन नंबरने लॉग इन करतात. ही सर्वात मोठी चूक आहे. असे केल्यास तुमचा जुना डेटा आणि ग्रुप्स निघून जातात. यासाठी व्हॉट्सॲपच्या Settings > Account > Change Number या पर्यायाचाच वापर करा.

जुन्या नंबरवरून 'चॅट बॅकअप' (Chat Backup) नक्की घ्या

नवीन नंबरवर व्हॉट्सॲप शिफ्ट करण्यापूर्वी जुन्या नंबरवरील संपूर्ण डेटाचा Google Drive किंवा iCloud वर बॅकअप घ्या. नंबर बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचण आल्यास तुमचा डेटा सुरक्षित राहील.

WhatsApp update
Mayor Election Results : महापौर निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, काँग्रेसचा सुपडा साफ; कुणाला कुठे किती मते मिळाली?

दोन्ही सिम कार्ड फोनमध्ये ॲक्टिव्ह ठेवा

नंबर बदलण्याची प्रक्रिया सुरू करताना जुना आणि नवीन अशा दोन्ही नंबरचे सिम कार्ड चालू स्थितीत असावेत. व्हॉट्सॲपकडून सुरक्षेचा भाग म्हणून दोन्ही नंबरवर ओटीपी (OTP) पाठवला जातो. तो प्रविष्ट केल्यानंतरच नंबर बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

पूर्वकल्पना द्या

व्हॉट्सॲपमध्ये नंबर बदलताना 'Notify Contacts' हा पर्याय मिळतो. याच्या मदतीने तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील लोकांना किंवा तुम्ही असलेल्या ग्रुप्सना तुमचा नंबर बदलल्याची माहिती आपोआप जाते. त्यामुळे तुमचा नवीन नंबर कोणालाही मॅन्युअली पाठवण्याची गरज पडत नाही.

WhatsApp update
Accident : भीषण अपघातात एकाच क्षणात ६ जणांचा करुण अंत, ७ गंभीर; महामार्गावरील दृश्य पाहून पोलीसही हादरले

टू-स्टेप व्हेरिफिकेशन (Two-Step Verification) बंद करा आणि पुन्हा सुरू करा

जर तुम्ही जुन्या नंबरवर टू-स्टेप व्हेरिफिकेशन पिन सेट केला असेल, तर नंबर बदलण्यापूर्वी तो डी-ॲक्टिव्हेट करा. नवीन नंबर यशस्वीरीत्या शिफ्ट झाल्यावर सुरक्षेसाठी पुन्हा नवीन 'टू-स्टेप व्हेरिफिकेशन पिन' सेट करायला विसरू नका.

वरील सोप्या ५ टिप्स पाळल्यास तुमचा कोणताही डेटा किंवा चॅट डिलीट न होता सहज नवीन नंबरवर व्हॉट्सॲप ट्रान्सफर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com