महागाई भत्ता वाढीबाबत नवीन अपडेट! केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची थकबाकी कधी जाहीर होणार, जाणून घ्या?

Central government employees DA hike 2026 expected percentageकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीबाबत मोठे अपडेट. 2026 मध्ये डीए वाढ कधी जाहीर होणार, किती टक्के वाढ होईल आणि थकबाकी कधी खात्यात जमा होणार याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Central government employees await the next Dearness Allowance hike and arrears payment announcement.
Central government employees await the next Dearness Allowance hike and arrears payment announcement.saam tv
Published On

केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवते. पहिली वाढ जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जाहीर होते, जी 1 जानेवारीपासून लागू केल्याचे मानले जाते. मार्च-एप्रिलमध्ये एरियरसह कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. तर दुसरी वाढ जुलै-ऑगस्टमध्ये जाहीर केली जाते, जी 1 जुलैपासून लागू होते आणि सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान एरियरसह दिली जाते.

Central government employees await the next Dearness Allowance hike and arrears payment announcement.
UAEमध्ये मोठा ड्रोन हल्ला, अणुऊर्जा प्रकल्प प्लांटमध्ये आगीचा भडका

2026 ला म्हणजेच यावर्षी सहामहीतील महागाई भत्ता एप्रिल महिन्यात लागू करण्यात आला होता आणि जानेवारीपासूनचा एरियरसह कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता दुसऱ्या सहामाहीतील महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. ही वाढ जुलैपासून लागू होऊन 3 ते 4 महिन्यांचा एरियर कर्मचाऱ्यांना मिळू शकतो.

Central government employees await the next Dearness Allowance hike and arrears payment announcement.
Digital India Internship: कोणतीही परीक्षा नाही, थेट मंत्रालयात इंटर्नशिपची संधी; स्टायपेंडदेखील मिळणार; अर्ज कसा करावा?

यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुमारे 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशी वाढ झाल्यास एकूण महागाई भत्ता 63 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. तसेच 8व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता मूळ पगारात विलीन करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. 2027 च्या पहिल्या सहामाहीत 8वा वेतन आयोग आपले अहवाल आणि शिफारसी सरकारकडे सादर करू शकतो.

Central government employees await the next Dearness Allowance hike and arrears payment announcement.
Ladki Bahin Yojana: १४ लाख लाडक्या बहिणींनी eKYC केलीच नाही, महत्त्वाची अपडेट आली समोर

दरम्यान, विविध राज्य सरकारांनीही महागाई भत्त्यात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. उत्तराखंड, बिहार, हरियाणा, राजस्थान, गोवा, ओडिशा, तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये दुसऱ्या सहामाहीतील महागाई भत्ता वाढवण्यात आला असून तो 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत नेण्यात आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे. तसेच सर्व सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता एरियरसह त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सप्टेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com