UAEमध्ये मोठा ड्रोन हल्ला, अणुऊर्जा प्रकल्प प्लांटमध्ये आगीचा भडका

Drone Attack on UAE’s Barakah Nuclear: यूएईमधील बरका अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला झाला असून वीज जनरेटरला आग लागली आहे. अधिकाऱ्यांनी किरणोत्सर्गी धोका नसल्याचे स्पष्ट केले.
Drone Attack on UAE’s  Barakah Nuclear:
UAE NUCLEAR PLANT TARGETED IN DRONE ATTACK; FIRE BREAKS OUT AT GENERATOR UNITsaam tv
Published On
Summary
  • यूएईतील बरका अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला झाला.

  • हल्ल्यानंतर वीज जनरेटरला आग लागल्याची माहिती समोर आली.

  • कोणतीही जीवितहानी किंवा किरणोत्सर्गी धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अल-अफ्रा प्रदेशातील बरका अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर एका वीज जनरेटरला आग लागली आहे. अबू धाबी मीडिया ऑफिसने जारी केलेल्या निवेदनानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की या घटनेत कोणीही जखमी झाले नाही आणि किरणोत्सर्गी सुरक्षिततेच्या पातळीवर कोणताही परिणाम झाला नाहीये.

Drone Attack on UAE’s  Barakah Nuclear:
पेट्रोल- डिझेल 3 रुपयांनी महागलं, महागाईनं गाठला 42 महिन्यांचा उच्चांक

युएईने निवेदनात काय माहिती दिली?

अबु धाबी मीडिया ऑफिसने रविवारी (१७ मे, २०२६) 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अल-धाफ्रा भागातील बरका अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाहेर असलेल्या पॉवर जनरेटरला आग लागली आहे. अबु धाबी प्रशासनाने तात्काळ प्रतिसाद दिला आहे."

ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली. यात कोणीही जखमी झाले नाही. किरणोत्सर्गी सुरक्षिततेच्या पातळीवर कोणताही परिणाम झाला नाहीये. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व खबरदारीचे उपाय योजण्यात आले असून, नवीन माहिती उपलब्ध होताच पुढील माहिती दिली जाईल.

संघीय अणुऊर्जा नियामक प्राधिकरणाने (FANR) पुष्टी केली आहे की, आगीमुळे वीज प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर किंवा त्याच्या महत्त्वाच्या प्रणालींच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. वीज प्रकल्पातील सर्व युनिट्स सामान्यपणे कार्यरत आहेत. जनतेला आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी केवळ अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्यावी आणि अफवा किंवा अपुऱ्या माहितीचा प्रसार करणे टाळावे.

Drone Attack on UAE’s  Barakah Nuclear:
इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? इराणला मिटवण्याचा ट्रम्पचा निर्धार

ड्रोन हल्ल्यासाठी कोण जबाबदार?

या ड्रोन हल्ल्यासाठी नेमके कोण जबाबदार आहे, हे निवेदनात स्पष्ट करण्यात आले नाही. इराणसोबत सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल संघर्षादरम्यान, संयुक्त अरब अमिरातीवर अलीकडे अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले झाले आहेत. ज्यामध्ये अधिकाऱ्यांनी काही घटनांसाठी इराणला जबाबदार धरले आणि सांगितले की या हल्ल्यांचे लक्ष्य ऊर्जा केंद्रे आणि सागरी पायाभूत सुविधा होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com