BSNL Recharge Plans : मोठी बातमी! फक्त ₹१७२ मध्ये महिनाभर बिनधास्त कॉलिंग! पाहा कोणता प्लॅन फायदेशीर

Unlimited Calling : BSNL ने ग्राहकांसाठी १७२,१८४ आणि १९० रुपयांचे तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन आणले आहेत.
BSNL Recharge Plans
BSNL Recharge Planssaam tv
Published On: 

मोबाईलवर सतत इंटरनेट वापरण्यापेक्षा फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने ग्राहकांसाठी तीन नवीन स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणलं आहेत. विशेष म्हणजे या प्लॅनची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी असून, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. यामध्ये सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन १७२ रुपयांचा आहे. त्यामुळे कमी खर्चात महिनाभर कॉलिंग करण्याचा पर्याय ग्राहकांना मिळू शकतो. चला या तिन्ही प्लॅनची किंमत आणि वैधता जाणून घेऊया.

BSNL चे तीन नवीन रिचार्ज प्लॅन

BSNL ने १७२ रुपये, १८४ रुपये आणि १९० रुपये असे तीन व्हॉइस-ओन्ली रिचार्ज प्लॅन आणले आहेत. या तिन्ही प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा मिळत नाही. मात्र अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० SMS पाठवण्याची सुविधा दिली जाते.

BSNL Recharge Plans
Bank Holidays November : १० आणि ११ नोव्हेंबरला बँका बंद! तुमच्या शहराचं नाव यादीत आहे का?

१. BSNL चा १७२ रुपयांचा प्लॅन

BSNL च्या तीन प्लॅनमध्ये हा सर्वात स्वस्त ऑप्शन आहे. यामध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. देशभरात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० SMS पाठवता येतात. या प्लॅनचा दर दिवसाला साधारण ६.१४ रुपये पडतो.

२. BSNL चा १८४ रुपयांचा प्लॅन

BSNL च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३० दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० SMS ची सुविधा आहे. मात्र यामध्ये इंटरनेट डेटा मिळत नाही.

३. BSNL चा १९० रुपयांचा प्लॅन

१९० रुपयांच्या रिचार्जमध्ये एका कॅलेंडर महिन्याची वैधता मिळते. यामध्येही अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० SMS पाठवण्याची सुविधा दिली आहे.

BSNL Recharge Plans
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार वाढ, ४ महिन्यांचे पैसेही मिळणार; पाहा कोणाला फायदा?

Airtel आणि Jio कडेही स्वस्त कॉलिंग प्लॅन

BSNL प्रमाणे Airtel कडेही १८५, २०३ आणि २०६ रुपयांचे व्हॉइस-ओन्ली प्लॅन आहेत. यामध्ये अनुक्रमे २८ दिवस, ३० दिवस आणि एका कॅलेंडर महिन्याची वैधता मिळते. अनलिमिटेड कॉलिंगसोबत एकूण ३०० SMS आणि फ्री HelloTunes ची सुविधाही दिली जाते.

तर Jio चे कॉलिंग प्लॅन १४७ रुपयांपासून सुरू होतात. १४७ रुपयांच्या प्लॅनमध्ये २२ दिवसांची वैधता आणि ३०० SMS मिळतात. याशिवाय १७७, १९६ आणि १९७ रुपयांचे प्लॅनही उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.