

सध्या महागाई वाढत चाललीये. सिलिंडरपासून ते साखरेच्या किंमतींपर्यंत सगळ्याच गोष्टींचे दर वाढतायेत. आता मोबाईलच्या रिचार्ज किंंमतींही उच्चांक गाठताना दिसतायेत. त्यातच जिओने ग्राहकांसाठी मोठं गिफ्ट दिलं. तुम्ही स्वस्त रिचार्जच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्त्वाची आहे. जिओच्या या प्लॅनची किंमत तब्बल १० हजार रुपये असेल, यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३ वर्षांची वैधता मिळेल. विशेष म्हणजे, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज डेटा, SMS यासोबत अनेक फायदेही दिले जातायेत. चला तर जाणून घेऊया या रिचार्ज प्लॅनमध्ये नेमकं काय मिळतं.
जिओच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना ३ वर्षांसाठी म्हणजेच दीर्घ कालावधीसाठी सेवा वापरण्याची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये दररोज २.५ GB हायस्पीड डेटा दिला जातो. म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण २७३७.५ GB डेटाचा लाभ मिळतो.
जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल ३६ महिन्यांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. यामध्ये रोमिंग कॉलचाही समावेश आहे. त्यामुळे दुसऱ्या शहरात किंवा राज्यात गेल्यानंतरही कॉलिंगची सुविधा सुरू राहते. तसेच दररोज १०० SMS पाठवण्याची सुविधाही मिळते. त्यामुळे कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी वेगळा रिचार्ज करण्याची गरज भासत नाही.
१० हजारांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये फक्त कॉलिंग आणि डेटाच नाही, तर इतर फायदेही मिळतात.
JioHotstar चे मोबाइल आणि हॉलीवूड सबस्क्रिप्शन.
JioAICloud वर ५० GB मोफत स्टोरेज.
१२ महिन्यांचे Canva Pro Lite सबस्क्रिप्शन.
Canva Pro Lite सबस्क्रिप्शनची सांगितलेली किंमत १,५९० रुपये.
जिओकडे १ वर्षाच्या वैधतेचे प्लॅनही आहेत. यामध्ये १,७४८ रुपयांचा प्लॅन उपलब्ध असून त्यात अनलिमिटेड कॉलिंग मिळते. मात्र मोबाइल डेटा मिळत नाही. याशिवाय ३,५९९ रुपयांचा वार्षिक प्लॅनही उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.