Diwali Bonus 2026 : दिवाळीत कर्मचाऱ्यांना मिळाला छप्परफाड बोनस, मालकाने थेट लाखोंची भेट दिली; VIDEO चर्चेत

Viral Video : सुरतमधल्या व्यावसायिक रामस्वरूप मुंडे यांनी दिवाळीनिमित्त आपल्या २० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांपेक्षा अधिक बोनस दिला.
Diwali bonus
Diwali bonussaam tv
Published On: 

दिवाळी म्हटलं की बोनस, मिठाई आणि भेटवस्तूंची चर्चा होते. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस देतात. पण गुजरातमधल्या सुरतमधल्या एका व्यावसायिकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या बोनसची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या व्यावसायिकाने आपल्या २० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांहून जास्त रक्कम भेट म्हणून दिली. महत्त्वाचं म्हणजे, ही रक्कम चांदीच्या आकर्षक पूजेच्या थाळ्यांमध्ये सजवून देण्यात आली. या अनोख्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्यावसायिकावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

कोण आहेत हे व्यावसायिक?

रामस्वरूप मुंडे असं या व्यावसायिकाचं नाव आहे. ते गुजरातमधल्या सुरतच्या वराच्या परिसरात कापडाचा व्यवसाय करतात. त्यांनी दिवाळीआधी आपल्या २० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम दिली. या पूजेच्या थाळ्यांमध्ये ०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांच्या गड्डा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या. इतकी मोठी भेट मिळाल्याने कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. यावेळी काही कर्मचारी भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं.

Diwali bonus
Gold Price Today : दिवाळीआधी सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! आठवडाभरात किती महागलं सोनं? पाहा २२, २४ कॅरेटचे भाव

कर्मचाऱ्यांना लाखोंचा बोनस देण्यामागचं कारण काय?

रामस्वरूप मुंडे यांनी कर्मचाऱ्यांना फक्त कामगार न मानता कुटुंबातले सदस्य मानलं आहे. त्यांच्या मते, व्यवसायाच्या यशात कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची मेहनत, प्रामाणिकपणा आणि अनेक वर्षांची साथ यांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी हा मोठा बोनस देण्याचा निर्णय घेतला.

Diwali bonus
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या वेबसाइटवर नविन अपडेट; कर्मचाऱ्यांसाठी काय आहे खास?

विशेष म्हणजे, मुंडे स्वतः अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आले. लहानपणी त्यांनी आर्थिक अडचणींचा सामना केला. त्यामुळे सणासुदीच्या काळात सामान्य कुटुंबांवर येणारा आर्थिक ताण त्यांना चांगलाच ठाऊक आहे. कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही आर्थिक टेन्शनशिवाय दिवाळी साजरी करता यावी, हा त्यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.