Gold Price Today : दिवाळीआधी सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! आठवडाभरात किती महागलं सोनं? पाहा २२, २४ कॅरेटचे भाव

Gold Price : दिवााळी लक्ष्मीपूजनाआधी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
Gold Price Today
Gold Price Todaysaam tv
Published On: 

Gold Price Weekly Update : गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात चांगली वाढ पाहायला मिळाली. जागतिक शेअर बाजारातली घसरण, एआय आणि टेक कंपन्यांबाबत वाढलेलं टेन्शन, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घसरण यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत ४.५ टक्क्यांची वाढ झाली. ऑगस्ट महिन्यानंतर सोन्याने एका आठवड्यातली सर्वात मोठी झेप घेतली.

आठवडाभरात सोन्याच्या दरात किती वाढ?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४१,४५२ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. मागच्या आठवड्याच्या अखेरीस हाच दर १,४०,०५४ रुपये होता. म्हणजेच आठवडाभरातच सोन्याच्या दरात जवळपास १ टक्क्यांची वाढ झाली.

Gold Price Today
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या वेबसाइटवर नविन अपडेट; कर्मचाऱ्यांसाठी काय आहे खास?

मात्र, भारतीय वायदा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली. डिसेंबर डिलिव्हरीचे एमसीएक्स सोनं १,७३१ रुपयांनी म्हणजेच १.२० टक्क्यांनी घसरून १,४२,३६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. दुसरीकडे, डिसेंबर डिलिव्हरीची चांदी ०.१० टक्क्यांनी वाढून १,८४,९७७ रुपये प्रति किलो झाली.

सोने-चांदीसाठी महत्त्वाचे दर

तज्ज्ञांच्या तांत्रिक विश्लेषणानुसार, एमसीएक्सवर सोन्यासाठी १,४३,००० ते १,४३,७०० रुपये हा महत्त्वाचा प्रतिरोध स्तर आहे. तर १,४१,००० ते १,४०,००० रुपये हा आधार स्तर मानला जातोय. चांदीसाठी १,८६,००० ते १,८८,००० रुपये प्रतिकिलो हा प्रतिरोध स्तर असून १,७८,००० ते १,८०,००० रुपये हा महत्त्वाचा आधार स्तर आहे. तर अमेरिकेतला व्याजदर वाढण्याची शक्यता आणि कर्जाचा वाढता खर्च यामुळे सोन्याच्या दरातल्या तेजीला मर्यादा येऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Gold Price Today
LPG Cylinder : दिवाळीच्या दिवशीच गॅस संपला? टेन्शन सोडा! इंडेनने दिले २ भन्नाट पर्याय

सोन्याच्या दरात वाढ होण्यामागे कारण काय?

जागतिक शेअर बाजारात टेक आणि एआय क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मग मोठ्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढू सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती दिली. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी घसरण झाली. अमेरिकेतल्या WTI क्रूडचा दर १०४-१०५ डॉलवरून जवळपास ९० डॉलर प्रति बॅरलवर आला. ब्रेंट क्रूडचे दरही ९७-९८ डॉलरच्या आसपास घसरले. आठवडाभरात कच्च्या तेलाच्या किमतीत १२ टक्क्यांहून जास्त घसरण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.