

दिवाळीच्या सणात घरात पाहुण्यांची ये-जा वाढलेली असते. फराळाचे पदार्थ, गोडधोड आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गॅसचा वापरही वाढतो. अशा वेळी ऐन सणाच्या दिवशी घरातल्या LPG सिलिंडर संपला तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. पण आता ग्राहकांसाठी इंडियन ऑइलकडून दोन ऑप्शन आहेत. इंडेनचे छोटू आणि मुन्ना हे छोटे गॅस सिलिंडर गरजेच्या वेळी उपयोगी ठरू शकतात.
इंडियन ऑइलच्या माहिनुसार, छोटू आणि मुन्ना हे दोन्ही सिलिंडर फ्री ट्रेड LPG (FTL) श्रेणीत येतात. कमी गॅस वापरणारे ग्राहक तसेच जास्त गॅसची गरज असणाऱ्यांसाठी हे ऑप्शन उपलब्ध आहेत.
घरात रोजचा १४.२ किलोचा गॅस सिलिंडर असतानाही जास्त गॅसची गरज लागत असेल, तर छोटू सिलिंडर तुम्हाला वापरता येऊ शकतो. लहान कुटुंबं, विद्यार्थी, स्थलांतरित नागरिक आणि कमी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय फायदेशीर ठरेल.
मुन्ना सिलिंडर हा कमी प्रमाणात गॅस लागणाऱ्या ग्राहकांना मिळू शकतो. विद्यार्थी, काम करणाऱ्या महिला, रस्त्यावरचे विक्रेते, स्थलांतरित कामगार आणि छोटे व्यावसायिक यांच्यासाठी हा सिलिंडर फायदेशीर ठरू शकतो. कमी जागेतही हा सिलिंडर ठेवता येतो.
तुम्हाला सिलिंडर घ्यायचा असेल तर स्थानिक पत्त्याचा पुरावा (Local Address Proof) देण्याची गरज नसते. इंडेन वितरकांसोबतच इंडियन ऑइलच्या काही रिटेल आउटलेट्स, निवडक किराणा दुकाने आणि सुपरमार्केटमध्येही रिफिलची सुविधा उपलब्ध आहे.
इंडियन ऑइलने २५ जुलै २०२६ रोजी ५ किलोच्या छोटू सिलिंडरसाठी एक्सप्रेस होम डिलिव्हरी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. या सुविधेअंतर्गत बुकिंगनंतर चार तासांच्या आत सिलिंडर पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीने ठेवलं.
सामान्य घरगुती ग्राहकांसाठी १४.२ किलोच्या LPG सिलिंडरची किंमत ९४२ रुपये असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १० रुपयांची वाढ होऊन ती २,८२० रुपये झाली.
पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यानुसार किमती ठरवल्या जातात. त्यामुळे दिवाळीत गॅस संपण्याचं टेन्शन असेल, तर छोटू आणि मुन्ना सिलिंडरचे पर्याय नक्की जाणून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.