Lakshmi Pujan Horoscope : पैसापाणी, नोकरी, प्रमोशन... लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या ५ राशींचे अच्छे दिन होणार सुरू

Lucky Zodiac Signs : लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातले अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.
Lakshmi Pujan Horoscope
Lakshmi Pujan Horoscopesaam tv
Published On: 

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि सुख-समृद्धीचा सण असतो. या दिवशी प्रत्येकजण माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची मनोभावे पूजा करतो. घरात सुख-शांती नांदावी, पैशाच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि भरभराट व्हावी, अशी प्रार्थना आपण करतो. यंदाची दिवाळी काही राशींसाठी विशेष शुभ ठरण्याची शक्यता आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ५ राशींच्या व्यक्तींना धनलाभ, नोकरीत प्रगती आणि व्यवसायात यश मिळण्याचे संकेत आहेत. चला तर जाणून घेऊया, कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी?

दिवाळी २०२६ कधी आहे?

यंदा दिवाळीचा सण ८ नोव्हेंबर २०२६, रविवार रोजी साजरा केला जाईल. कार्तिक महिन्यातल्या अमावस्या तिथीला दिवाळी साजरी करण्याची परंपरा असते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते.

Lakshmi Pujan Horoscope
Owl Significance : दिवाळीत घुबड दिसल्यास खरंच भरपूर पैसा मिळतो का? जाणून घ्या संकेत

दिवाळीचे महत्त्वाचे मुहूर्त:

दिवाळी : ८ नोव्हेंबर २०२६, रविवार

अमावस्या तिथी प्रारंभ : ८ नोव्हेंबर, सकाळी ११:२७ वाजता

अमावस्या तिथी समाप्त : ९ नोव्हेंबर, दुपारी १२:३१ वाजता

लक्ष्मीपूजन मुहूर्त : संध्याकाळी ५:५४ ते रात्री ७:५०

प्रदोष काळ : संध्याकाळी ५:३१ ते रात्री ८:०९

Lakshmi Pujan Horoscope
8th Pay Commission: रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ८व्या वेतन आयोगात पगारासोबत मिळणार ४ मोठे भत्ते?

या ५ राशींचं नशीब चमकणार?

वृषभ रास

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी दिवाळी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते. आर्थिक अडचणी दूर होतील. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत दिलासा मिळू शकतो. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायद्याच्या संधी मिळतील.

सिंह रास

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दिवाळी विशेष ठरेल. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. नोकरीत पद आणि प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन करार होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

तूळ रास

तूळ राशीच्या व्यक्तींना दिवाळीच्या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसायात नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद आणि गोडवा कायम राहील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी दिवाळी भाग्यशाली ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात नफा वाढण्याचे संकेत आहेत. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील.

डिस्क्लेमर: वरील राशीभविष्य ज्योतिषीय गणनांवर आधारित आहे. यामध्ये दिलेले अंदाज निश्चित भविष्यवाणी नाहीत. कोणताही महत्त्वाचा आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक निर्णय घेताना स्वतःचा विवेक वापरावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.