Owl Significance : दिवाळीत घुबड दिसल्यास खरंच भरपूर पैसा मिळतो का? जाणून घ्या संकेत

Diwali 2026 : धार्मिक मान्यतेनुसार घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन मानलं जातं. पण हे घुबड दिवाळीच्या दिवसांत दिसणं चांगले की वाईट हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
Owl Sighting on Diwali
Owl Sighting on Diwalisaam tv
Published On: 

दिवाळी म्हटलं की घरात दिव्यांची रोषणाई, लक्ष्मीपूजन आणि सुख-समृद्धीची कामना केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. पण तुम्हाला माहितीये का, दिवाळीच्या रात्री घुबड दिसणं काही लोक शुभ मानतात? धार्मिक मान्यतेनुसार घुबड हे लक्ष्मी मातेचं वाहन आहे. त्यामुळे दिवाळीच्या रात्री घुबड दिसलं तर घरात धन-संपत्ती आणि सुख-समृद्धी येण्याचे संकेत मानलं जातं. पण यामागे नेमकी काय मान्यता आहे? जाणून घेऊया.

घुबडाला लक्ष्मी मातेचं वाहन का मानलं जातं?

हिंदू धर्मातल्या पौराणिक मान्यतांनुसार घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन आहे. घुबडाला बुद्धिमत्ता, सतर्कता आणि विवेकाचं प्रतीक मानलं जातं. घुबड अंधारातही सहज पाहू शकतं. त्यामुळे त्याचा संबंध जागरूकता आणि योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेशी जोडला जातो. लक्ष्मी मातेचं वाहन घुबड असण्यामागेही एक महत्त्वाचा संदेश असल्याचं बोललं जातं. माणसाकडे कितीही पैसा आणि संपत्ती आली, तरी त्याने अहंकार करायचा नसतो. पैशांचा योग्य वापर करा आणि लोभापासून दूर राहावं, असा संदेश यातून दिला जातो.

Owl Sighting on Diwali
8th Pay Commission: रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ८व्या वेतन आयोगात पगारासोबत मिळणार ४ मोठे भत्ते?

दिवाळीच्या रात्री घुबड दिसलं तर काय संकेत मिळतात?

धार्मिक मान्यतेनुसार दिवाळीच्या रात्री घुबड दिसणं शुभ मानलं जातं. काही लोक याला घरात सुख-समृद्धी येण्याचा आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा संकेत मानतात. घरात आर्थिक भरभराट होईल, अशी काहींची श्रद्धा असते. कुटुंबात आनंद आणि समाधान येण्याचं प्रतीक मानलं जातं. देवी लक्ष्मीची विशेष कृपा होण्याचा संकेत म्हणूनही घुबडाकडे पाहिलं जातं. आयुष्यात चांगले दिवस येण्याची आशा या मान्यतेशी जोडली जाते.

Owl Sighting on Diwali
DA Hike: कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट! DA मध्ये ३% पर्यंत वाढ, जुलैपासून मिळणार वाढीव पैसे; कोणाला किती फायदा?

दिवाळीच्या रात्री घराजवळ किंवा परिसरात घुबड दिसल्यावर घाबरून जाण्याची गरज नाही. धार्मिक श्रद्धेनुसार मनोभावे लक्ष्मी मातेचं स्मरण करा. घरातल्या देवघरात दिवा लावून सुख-शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. पण घुबडाला पकडण्याचा, हाकलण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. हा वन्यजीव असल्यामुळे त्याला सुरक्षित अंतरावरून पाहा.

डिस्क्लेमर: घुबड दिसणं शुभ किंवा अशुभ असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. ही माहिती धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.