

आठव्या वेतन आयोगाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. अशातच आता रेल्वे कर्मचाऱ्यांनीही पगारवाढीची मागणी केली. ऑल इंडिया रेल्वेमेन्स (AIRF) ३० ऑक्टोबर रोजी आठव्या वेतन आयोगासमोर आपल्या मागण्या मांडल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांचं कामाचं स्वरुप, तांत्रिक जबाबदाऱ्या आणि कामातले धोके लक्षात घेऊन वेतनश्रेणी निश्चित करावी, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
AIRF ने आठव्या वेतन आयोगाकडे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी जास्त वेतनश्रेणी लागू करण्याची मागली केली. रेल्वे सेवा वर्षभर २४ तास सुरू असते. वेगवेगळ्या हवामानात आणि भौगोलिक परिस्थितीत कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं. त्यामुळे बाकीच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाचं स्वरूप वेगळं असल्याचं संघटनेने स्पष्ट केलं.
रेल्वेचे आता आधुनिकीकरण वेगात होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना जास्त तांत्रिक ज्ञान आणि कौशल्याची गरज भासते. त्यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्यांनुसार वेतन निश्चित करावं, अशी मागणा करण्यात आली आहे.
कामाच्या ठिकाणी होणारे अपघात, गंभीर दुखापती आणि जीवितहानीचा धोका लक्षात घेऊन
AIRF ने विशेष भत्त्यांची मागणी केली.
१. Risk and Hardship Allowance: जोखीम आणि कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी विशेष भत्ता.
२.Hazardous Duty Allowance: धोकादायक कामांसाठी जास्तीचा भत्ता.
३. Hill Allowance: डोंगराळ भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भत्ता.
४. Dress Allowance: गणवेश आणि कपड्यांसाठी भत्ता.
रेल्वे रुळांची देखभाल करणाऱ्या ट्रॅक मेंटेनर्सचं काम अत्यंत जोखमीचं असतं. रेल्वे ट्रॅकची गुणवत्ता आणि अचूकता राखण्यासाठी त्यांना विशेष तांत्रिक कौशल्याची गरज असते. त्यामुळे ट्रॅक मेंटेनर्सना इतर अभियांत्रिकी विभागातल्या तंत्रज्ञांप्रमाणे वेतन आणि सुविधा द्याव्यात, अशी मागणी AIRF ने केली आहे. तसेच पेट्रोलमन, कीमन आणि गेटमन यांच्यासाठीही विशेष भत्ते देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.