HDFC FD Rates : HDFC बँकेचा मोठा निर्णय! FD व्याजदर वाढवले, १० लाखांवर मिळणार एवढा परतावा

HDFC Bank : एचडीएफसी बँकेने एफडीवरचं व्याजदर वाढवलं आहे. जाणून घ्या १० लाखांच्या गुंतवणुकीवरच्या पाच वर्षांचा परतावा.
HDFC FD Rates
HDFC FD Ratessaam tv
Published On: 

बँकेत पैसे सुरक्षित ठेवून त्यावर चांगला परतावा मिळवायचा असेल, तर फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा बऱ्याच जणांचा आवडता ऑप्शन आहे. अशातच खासगी क्षेत्रातल्या एचडीएफसी बँकेने एफडीच्या व्याजदरात वाढ केली. त्यामुळे एफडीमध्ये पैसे गुंतवणाऱ्या ग्राहकांना आता जास्त व्याज मिळू शकतं. महत्त्वाचं म्हणजे जेष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा जास्त व्याजदर मिळेल. तर १० लाख रुपयांची एफडी केल्यावर ५ वर्षांनंतर किती पैसे मिळतील, हे समजून घ्यायला हवं.

४ नोव्हेंबरपासून नवे व्याजदर लागू

एचडीएफसी बँकेने ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या काही एफडीवरच्या व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ केली. हे नवीन दर ४ नोव्हेंबर २०२६ पासून लागू झाले.

बँकेने ६१ दिवस ते ६ महिन्यांच्या एफडीवरील व्याजदर ४.२५ टक्क्यांवरून ४.७५ टक्के केला. तर ६ महिने १ दिवस ते ९ महिन्यांपर्यंतच्या ठेवींवर ५.६५ टक्के व्याज मिळेल. ९ महिने १ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी वेळेच्या एफडीवर ५.९० टक्के व्याजदर लागू करण्यात आला.

HDFC FD Rates
Indian Bank Recruitment : पदवी झाली अन् नोकरी शोधताय? इंडियन बँकेत निघाली १५०० जागांची मेगाभरती; कसा कराल अर्ज?

१ ते ५ वर्षांच्या एफडीवर किती व्याज?

१ वर्ष ते १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ६.२५ टक्के, तर १५ ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ६.३५ टक्के व्याज मिळेल. तसेच ३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षांपर्यंतच्या काही एफडीवर ६.६० टक्के व्याजदर लागू असेल.

HDFC FD Rates
Bank Holiday 2026 : ८ नोव्हेंबरपासून बँका राहणार बंद; तुमच्या राज्यातील सुट्ट्यांची यादी पाहा

ज्येष्ठ नागरिकांना ७.२० टक्क्यांपर्यंत व्याज

एचडीएफसी बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज दिले जात आहे. ३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ७.२० टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते.

१० लाखांच्या एफडीवर किती होणार कमाई?

समजा, ६० वर्षांखालच्या एखाद्या व्यक्तीने १० लाख रुपयांची एफडी ५ वर्षांसाठी केली, तर ६.६० टक्के व्याजदरानुसार मुदतपूर्तीनंतर त्याला अंदाजे १३,८७,२२७ रुपये मिळतील. म्हणजेच ३,८७,२२७ रुपयांचे व्याज मिळेल.

दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांनी १० लाख रुपयांची एफडी ५ वर्षांसाठी केल्यास ७.२० टक्के व्याजदरानुसार मुदतपूर्तीनंतर अंदाजे १४,२८,७४८ रुपये मिळतील. यात ४,२८,७४८ रुपये व्याजाच असेल. त्यामुळे एफडी करण्यापूर्वी बँकेचे लागू व्याजदर, मुदत आणि व्याज मोजण्याची पद्धत तपासणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.