Diwali gifts for employees: मालक असावा तर असा! कर्मचाऱ्यांना दिलं १ लाख रुपयांचा दिवाळी बोनस

Employee bonus news: सुरतमधील कापड व्यापारी रामस्वरूप मुंडे यांनी दिवाळीनिमित्त आपल्या २० कर्मचाऱ्यांना एक लाख रुपयांपेक्षा जास्त बोनस दिला. नोटांच्या बंडलांनी सजवलेल्या थाळ्यांमधून दिलेल्या या खास भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्यापाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Diwali gifts for employees
Diwali gifts for employeessaam tv
Published On: 

दिवाळीत कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना काही ना काही भेटवस्तू देतात. कोणाला ट्रॉली बॅग्स, चॉकलेट्स, किचन सेट किंवा अगदी काहींना सोनपापडीचं पाकिटंही गिफ्ट म्हणून मिळालं असेल. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, काहींना गिफ्ट म्हणून १ लाखांपेक्षा जास्त पैसे तेही चक्क नोटांची बंडलं देण्यात आलीयेत तर...तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पण सूरतमधील एक कपडा व्यापाराने त्याच्या कर्मचाऱ्यांना असं गिफ्ट दिलंय.

सुरतमधील एका कापड व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क एक लाख रुपयांपेक्षा जास्त बोनस देऊन त्यांची दिवाळी गोड केली आहे. या व्यापाऱ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

२० कर्मचाऱ्यांना दिला लाखोंचा बोनस

सुरतमधील वराछा परिसरातील सुदामा चौकमध्ये महादेव क्लॉथ सेंटर नावाचं कापड दुकान आहे. या दुकानाचे मालक रामस्वरूप मुंडे यांनी दिवाळीनिमित्त आपल्या २० कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं. त्यांनी एका खास पद्धतीने कर्मचाऱ्यांना रोख रक्कम भेट दिली.

Diwali gifts for employees
PM मोदींनी घेतली पाकिस्तानच्या पंतप्रधानांची सर्वांसमोर शाळा; दहशतवादाच्या मुद्द्यावर दिला कडक मेसेज

यासाठी त्यांनी मोठ्या पूजा थाळ्यांमध्ये नोटांच्या बंडलांची आकर्षक सजावट केली होती. त्यानंतर रामस्वरूप मुंडे यांच्या पत्नीने प्रत्येक कर्मचाऱ्याला एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बोनस म्हणून दिली.

बोनस पाहून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

एक लाख रुपयांपेक्षा जास्त बोनस मिळाल्याने कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. इतकी मोठी रक्कम भेट म्हणून मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. काही कर्मचाऱ्यांनी व्यापारी रामस्वरूप मुंडे आणि त्यांच्या पत्नीचे पाय धरून आभार मानले.

Diwali gifts for employees
मोदींच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत भाजपनं साधला डाव; विरोधकांना चीतपट देण्यासाठी चव्हाण मैदानात

या कार्यक्रमात नोटांची सजावटही खास आकर्षण ठरली. १०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नव्या आणि चमकदार नोटांचे अनेक बंडल पूजेच्या थाळीमध्ये मांडण्यात आले होते. नोटांनी भरलेल्या या मोठ्या थाळ्या पाहून कर्मचारी काही काळ अवाक् झाले. वर्षभर केलेल्या मेहनतीचा असा सन्मान मिळाल्याने अनेक कर्मचारी भावूक झाले.

'कर्मचारी नाही, तर कुटुंबातील सदस्य'

आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना व्यापारी रामस्वरूप मुंडे म्हणाले की, त्यांच्या दुकानात काम करणारे लोक हे केवळ कर्मचारी नसून त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. वर्षभर कर्मचारी मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करतात. त्यांच्या मेहनतीमुळेच व्यवसाय पुढे जातो.

दिवाळीसारख्या पवित्र सणाला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पैशांची अडचण येऊ नये ही आपली जबाबदारी असल्याचंही मुंडे यांचं मत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या कुटुंबासोबत दिवाळीची खरेदी करता यावी आणि त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण राहावं यासाठी हा बोनस दिल्याचं त्यांनी सांगितलंय.

Diwali gifts for employees
Narendra Modi Diwali wishes: जवानांसोबत दिवाळी साजरी करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांना खास संदेश, म्हणाले...!

कर्मचाऱ्यांना लाखोंचा बोनस देतानाचा रामस्वरूप मुंडे आणि त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. अनेक जण हा व्हिडिओ शेअर करत असून, व्यापाऱ्याच्या या निर्णयाचे कौतुक केले जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.