Narendra Modi Diwali wishes: जवानांसोबत दिवाळी साजरी करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांना खास संदेश, म्हणाले...!

Narendra Modi Diwali wishes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त देशवासीयांना खास व्हिडिओ संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट आणि अयोध्येतील दीपोत्सवही चर्चेत आहे.
Narendra Modi Diwali wishes
Narendra Modi Diwali wishessaam tv
Published On: 

देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना शुभेच्छा दिल्यात. दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोदी यांनी व्हिडिओ पोस्ट करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्याचप्रमाणे येणारा काळ प्रत्येकासाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो अशी प्रार्थनाही त्यांनी केली. याआधी मोदी यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Narendra Modi Diwali wishes
Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म'एक्स'वरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सुरूवात त्यांनी 'नमस्ते' म्हणत केली. यावेळी त्यांनी दिवाळीच्या सणाचं महत्त्व सांगत देशभरात प्रकाशाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचं म्हटलं.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

मोदी म्हणाले की, दिवाळीचा पवित्र सण संपूर्ण देशाला प्रकाशाने उजळून टाकतो. अंधाराविरुद्ध लढण्याचा आणि त्यावर मात करण्याचा संदेश हा सण देतो. सर्व देशवासीयांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. येणारा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

तसंच आपणही इतरांप्रमाणेच मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतो. दरवर्षी देशाच्या शूर जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली परंपरा आहे. यंदाही ही परंपरा कायम राहणार असल्याचं मोदी यांनी व्हिडिओ संदेशात सांगितलं.

Narendra Modi Diwali wishes
Maharashtra Poltitics: काँग्रेसला चीनकडून पैसा मिळतोय, मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक दावा

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची घेतली भेट

दिवाळीच्या शुभेच्छा देण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांनीही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी 'एक्स'वरील पोस्टमधून या भेटीची माहिती दिली. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत दिवाळीच्या शुभेच्छांही एकमेकांना दिल्यात, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

अयोध्येतील दीपोत्सवासाठी उपराष्ट्रपतींचं स्वागत

यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी अयोध्येत होणाऱ्या दहाव्या दीपोत्सवासाठी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचं स्वागत केलं. या पवित्र सोहळ्यात त्यांची उपस्थिती प्रकाशाच्या या सणाला ऐतिहासिक आणि अविस्मरणीय बनवेल असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

Narendra Modi Diwali wishes
Maharashtra Politics: 'जर एकत्र यायचं असेल तर आम्हाला,....'; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट प्रतिक्रिया

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'एक्स'वरील पोस्टमधून विविध देशांचे राजदूत, उच्चायुक्त आणि राजनैतिक अधिकाऱ्यांचंही स्वागत केलं. यावेळी त्यांनी शरयू नदीच्या काठावर ३० लाखांहून अधिक मातीचे दिवे लावण्यात येणार आहेत. हा दीपोत्सव म्हणजे अंधारावर सत्याचा आणि धर्माचा नेहमी होणारा विजय असल्याचा संदेश देणारा सोहळा असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.