Maharashtra Politics: 'जर एकत्र यायचं असेल तर आम्हाला,....'; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट प्रतिक्रिया

NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना सुनील तटकरे यांच्या विधानानंतर वेग आलाय. प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिलीय.
Ncp Merger Buzz: Devendra Fadnavis Reacts To Sharad Pawar And Ajit Pawar Factions
Ncp Merger Buzz: Devendra Fadnavis Reacts To Sharad Pawar And Ajit Pawar Factionssaam tv
Published On: 
Summary
  • दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग.

  • प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतली.

  • दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा अधिकृत निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांमुळे दिवाळीनंतर राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याची शक्यता आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा नव्यानं सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आता शरद पवार गटातील नेते शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक बंगल्यावर दाखल होत असून घडामोडींना वेग आलाय. (Ncp Merger Buzz: Devendra Fadnavis Reacts To Sharad Pawar And Ajit Pawar Factions)

सुनील तटकरेंच्या विलीनीकरणाच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया दिलीय. शरद पवार हे रुग्णालयात अॅडमिट असताना प्रफु्ल्ल पटेल हे त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत विधान केलं होतं. जर अजित पवार असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या, असं विधान त्यांनी केलं होतं.

Ncp Merger Buzz: Devendra Fadnavis Reacts To Sharad Pawar And Ajit Pawar Factions
Mahayuti Rift: महायुतीत पुन्हा ठिणगी! स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेना-भाजप आमनेसामने

शरद पवार यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली. यावर भाजपनं सावध भूमिका घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत प्रतिक्रिया देताना विधान केलंय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांच्या पक्षांचे निर्णय संबंधित नेतेच घेतील. एका बाजूला शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यासारखे नेते आहेत.

Ncp Merger Buzz: Devendra Fadnavis Reacts To Sharad Pawar And Ajit Pawar Factions
अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरेंना हवं होतं उपमुख्यमंत्रिपद अन् अर्थखातं...शिंदेसेनेच्या नेत्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

त्यामुळे त्यांच्या पक्षांबाबत आम्ही निर्णय घेणं किंवा त्यावर भाष्य करणे योग्य नाहीये. मात्र, दोन्ही पक्षांना एकत्र येण्याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल किंवा त्या संदर्भात चर्चा करायची असेल, तर ते आम्हाला विश्वासात घेतील. कारण एनडीएमधील भाजप हा सर्वात मोठा भागीदार असल्याचं फडणवीस म्हणालेत. सध्या या विषयावर नेमकी काय चर्चा सुरूय. याबाबत आपल्याला अधिक माहिती नसल्याचेही फडणवीसांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.