Holiday's In October Month: सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत.येत्या ऑक्टोबर महिन्यात सणासुदीचे दिवस असणार आहे. या सणासुदीच्या दिवसात अनेक सुट्ट्या असतात. ऑक्टोबर महिन्यात बँकानादेखील बरेच दिवस सुट्ट्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात बँकांना किती दिवस सुट्ट्या असणार आहे. याची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे.
ऑक्टोबर महिन्यात नवरात्र, गांधी जयंती, दिवाळी असे सण आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना जास्त सुट्ट्या मिळणार आहेत. आजकाल बँकेची सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने होतात. परंतु काही कामांसाठी आपल्याला बँकेत जावे लागते. जर तुमचे बँकेत काही काम असेल तर बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहून जा.ऑक्टोबर महिन्यात सणासुदीचे दिवस त्याचसोबत वीकेंडला सुट्टी असणार आहे.
२ ऑक्टोबर बुधवार - महात्मा गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात बँका बंद राहणार आहेत.
३ ऑक्टोबर (गुरुवार)- शारदीय नवरात्री आणि महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.
६ ऑक्टोबर (रविवार)- वीकेंडसाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे.
१० ऑक्टोबर (गुरुवार)- महास्तमीनिमित्त देशातील काही ठिकाणी बँका बंद राहणार आहेत.
११ ऑक्टोबर (शुक्रवार)- महानवमीच्या मूहूर्तावार बँका बंद राहणार आहेत. (Bank Holidays)
१२ ऑक्टोबर (शनिवार)- दसरा आणि दुसरा शनिवारनिमित्त बँका बंद राहणार आहेत.
१७ ऑक्टोबर (गुरुवार)- काटी बिहूनिमित्त आसामध्ये बँका बंद राहणार आहे. वाल्मिकी जयंतीनिमित्त देशातील अनेक राज्यात बँका बंद राहणार आहेत.
२६ ऑक्टोबर (शनिवार)- चौथा शनिवार असल्याचे देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
२७ ऑक्टोबर(रविवार)- रविवारी सर्व बँका बंद राहणार आहेत.
३१ ऑक्टोबर (गुरुवार)- नरक चतुर्दशीनिमित्त देशातील काही राज्यात बँका बंद राहणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.